लसीकरण मोहिमेत राजकीय वशिलेबाजी, अंबरनाथमध्ये आरोग्य कर्मचारी हतबल, कारवाई करण्याची मागणी

अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राजकीय वशिलेबाजी सुरू असल्याची बाब समोर आलीये.

लसीकरण मोहिमेत राजकीय वशिलेबाजी, अंबरनाथमध्ये आरोग्य कर्मचारी हतबल, कारवाई करण्याची मागणी
सांकेतिक फोटो

ठाणे : अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राजकीय वशिलेबाजी सुरू असल्याची बाब समोर आलीये. या राजकीय वशिलेबाजीला आळा घालण्याची मागणी खुद्द छाया उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. (politician interrupting Corona vaccination in Ambernath Maharashtra medical workers demands action against them)

राजकीय नेत्यांची वशिलेबाजी, सामान्यांवर अन्याय होत असल्याची भावना

अंबरनाथ शहरात ऑर्डनन्स हॉस्पिटल आणि छाया उपजिल्हा रुग्णालय अशा दोन ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जातेय. या ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांकडून एकगठ्ठा टोकन घेणं, रांगेत आपली लोकं जथ्यानं मध्ये घुसवणं असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी सर्वसामान्यांकडून केल्या जात होत्या. यामुळे टोकनसाठी आणि लसीसाठी तासनतास रांगेत उभ्या असलेल्या सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत होती. याबाबत छाया उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली.

वशिलेबाजीला विरोध केल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद

राजकीय वशिलेबाजीपुढे आम्हीही हतबल असल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. शहरातले नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते हे झुंडीनं आपले 10-10, 20-20 लोक मध्ये घुसवतात. यात सर्वसामान्यांवर अन्याय होतो. मात्र आम्ही त्यांना थांबवले तर आमच्याशीच हे कार्यकर्ते वाद घालतात. त्यामुळे आतापर्यंत आम्ही 3 वेळा पोलिसांना बोलावलं होतं, असं छाया हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

आम्ही लवकरच टोकन सिस्टीम बंद होणार

दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या प्रतिक्रियेनंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मात्र दोन्हीकडून मरण होत असल्याचं समोर येत आहे. याबाबत छाया हॉस्पिटलचे अधीक्षक शशिकांत दोडे यांना विचारलं असता, आम्ही लवकरच टोकन सिस्टीम बंद करणार असून जो आधी येईल त्याला लस, अशा पद्धतीने लसीकरण मोहीम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

VIDEO : पिंपरी चिंचवड पोलिसांचा कोयता भाईला दणका, जिथे कोयता मिरवला त्याच परिसरातून वरात

जळगावमध्ये तुफान पावसानं शेतकरी दाम्पत्य बैलगाडीसह पुरात वाहून गेलं, बैलांचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता

पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती

(politician interrupting Corona vaccination in Ambernath Maharashtra medical workers demands action against them)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI