Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिकमध्ये दिवसभरात 157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

| Updated on: Jul 16, 2021 | 12:04 AM

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिकमध्ये दिवसभरात 157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
CORONA latest cases

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 8,602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 6,067 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,44,801 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,06,764 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.17 % झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 15 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jul 2021 08:06 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नाशिक कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 157

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 162

    नाशिक मनपा- 63

    नाशिक ग्रामीण- 91

    मालेगाव मनपा- 01

    जिल्हा बाह्य- 07

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8450

    आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 06

    नाशिक मनपा- 03

    मालेगाव मनपा- 00

    नाशिक ग्रामीण- 03

    जिल्हा बाह्य- 00

  • 15 Jul 2021 06:34 PM (IST)

    नागपुरात आज 17 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज 17 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    15 जणांनी केली कोरोनावर मात

    तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 477413

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 468263

    एकूण मृत्यू संख्या – 9039

  • 15 Jul 2021 06:33 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 2 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही

    आतापर्यंत 1132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    आतापर्यंत 56531 जणांनी केली कोरोनावर मात

    तर सध्या 48 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 15 Jul 2021 06:18 PM (IST)

    उद्या नागपूर मनपा केंद्रामध्ये कोविशिल्ड लस उपलब्ध, लसीकरण होणार

    नागपूर -उद्या नागपूर मनपा केंद्रामध्ये कोविशिल्ड लस उपलब्ध, लसीकरण होणार

    राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे 18 वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या 145 केंद्रावर होणार आहे.

    या वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

    त्यांचे लसीकरण सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत केले जाईल.

    यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल.

    सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोविशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहे.

    ही माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली.

  • 15 Jul 2021 06:09 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 334 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 334 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

    - दिवसभरात 212 रुग्णांना डिस्चार्ज.

    - पुण्यात करोनाबाधीत 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 4

    -225 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या  482916

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3033

    - एकूण मृत्यू -8674

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 471209

  • 15 Jul 2021 12:17 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम कायम

    उस्मानाबाद

    जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम कायम

    जिल्ह्यात किती शाळा सुरु होणार याची माहिती शिक्षण विभागाकडेच नाही

    अनेक ग्रामपंचायतीने ठराव न दिल्याने शाळा सुरू करण्यास अडचण

    गावातील शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव देने बंधनकारक

    उस्मानाबाद जिल्ह्यात पाचशेच्यावर गावे आहेत कोरोना मुक्त

    शिक्षण विभाग व ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक शाळा सुरु होणार का नाही यावरच प्रश्न चिन्ह

  • 15 Jul 2021 12:15 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल

    कोल्हापूर

    जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल

    जिल्हाधिकारी कार्यालयात पथक घेणार आरोग्य यंत्रणा कडून माहिती

    तीन सदस्यीय समिती जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

    बैठकीनंतर पथक काही ठिकाणी भेटी देण्याची ही शक्यता

  • 15 Jul 2021 12:14 PM (IST)

    बजाजनगर लसीकरण केंद्रावर आज पुन्हा उडाला गोंधळ, लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी

    औरंगाबाद -

    बजाजनगर लसीकरण केंद्रावर आज पुन्हा उडाला गोंधळ

    लसीकरणासाठी नागरिकांची उसळली तुफान गर्दी

    गर्दीतील 300 नागरिकांना लसीकरणासाठी वाटले कुपन

    तर उरलेल्या नागरिकांचा केंद्रावर गोंधळ सुरू

  • 15 Jul 2021 09:56 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील शाळा आजपासून होणार सुरु

    अमरावती जिल्ह्यातील शाळा आजपासून होणार सुरु

    आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा होणार सुरु

  • 15 Jul 2021 09:52 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मुक्त गावात शाळांची घंटा वाजण्यास सुरुवात

    औरंगाबाद -

    औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मुक्त गावात शाळांची घंटा वाजण्यास सुरुवात

    जिल्ह्यात सर्वात आधी गणेशवाडी शाळेने केला शाळांचा श्रीगणेशा

    कालपासून गणेशवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची वाजली घंटा

    तब्बल दीड वर्षानंतर शाळेत सुरू झाला किलबिलाट

    शिक्षकांकडूनही वर्गात अध्यापनाचे काम सुरू

    शाळा सुरू करण्याला गावकऱ्यांनी दिला होता दुजोरा

  • 15 Jul 2021 09:49 AM (IST)

    देशात 24 तासात 41हजार 806 नवे कोरोना रुग्ण

    दिल्ली -

    देशात 24 तासात नवे रूग्ण - 41,806

    देशात 24 तासात मृत्यू - 581

    देशात 24 तासात डीस्चार्ज - 39,130

    एकूण रूग्ण -3,09,87,880

    एकूण मृत्यू - 4,11,989

    एकूण डीस्चार्ज -3,01,43,850

    एकूण एक्टीव्ह रूग्ण - 4,32,041

    एकूण लसीकरण - 39,13,40,491

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

  • 15 Jul 2021 09:15 AM (IST)

    मुंबईच्या बीकेसी कोविड सेंटरबाहेर लसीच्या प्रतिक्षेत रस्त्यावर बसले लोक

    मुंबईच्या बीकेसी कोविड सेंटरबाहेर लसीच्या प्रतिक्षेत रस्त्यावर बसले लोक….

    - पहाटे पाच पासून वसई विरारहून आलेयत लोक… काहींना मेसेज येऊनही लसीसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत….

    - आज २९ लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिनचा दुसरा डोज दिला जाणार…

    - ५० टक्के वाॅकइन आणि ५० टक्के आॅनलाईन प्रवेश दिला जाणार…. त्यामुळे मोठा घोळ…

    - मुंबईत लसीचा साठा मर्यादीत असल्याने लोक हैराण….

    - काही करा पण लस द्या अशी नागरीकांची मागणी…

  • 15 Jul 2021 08:34 AM (IST)

    नागपुरात आज पुन्हा लसीकरण बंद

    - नागपुरात आज पुन्हा लसीकरण बंद

    - मनपा केन्द्रांमध्ये आज कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

    - कोव्हीशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर लसीकरण बंद

    - लसीकरण बंदचा विदेशात जाणाऱ्या मुलांना मनस्ताप

    - नागपूरात लसीकरणाचा खेळखंडोबा सुरुच

  • 15 Jul 2021 07:50 AM (IST)

    सोलापूर शहरात आज लसीकरण नाही

    सोलापूर-- शहरात आज लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार नाही

    लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प

    एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता वारंवार होत आहे लसीकरण मोहीम ठप्प

  • 15 Jul 2021 07:43 AM (IST)

    राज्यात  8,602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

    राज्यात  8,602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,067 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,44,801 रुग्ण बरे7 होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,06,764 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.17 % झाले आहे.

  • 15 Jul 2021 07:11 AM (IST)

    राज्यात 8,602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

    राज्यात आज 8,602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,067 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,44,801 रुग्ण बरे7 होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,06,764 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.17 % झाले आहे.

Published On - Jul 15,2021 6:29 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.