‘लसीकरणात ठाण्याला झुकते माप, डोंबिवलीकरांशी दुजाभाव; हे राजकारण नाही तर काय?’

आता ठाणेकर विरुद्ध डोंबिवलीकर असे राजकारण रंगण्याची शक्यता आहे. | Covid vaccination

'लसीकरणात ठाण्याला झुकते माप, डोंबिवलीकरांशी दुजाभाव; हे राजकारण नाही तर काय?'
मनसे आमदार राजू पाटील
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 7:44 AM

ठाणे: महाविकासआघाडीतील बडे नेते कोरोनासाठी (Coronavirus) मिळणाऱ्या मदतीचा मोठा भाग आणि वैद्यकीय सुविधा आपापल्या जिल्ह्यात नेतात, या विरोधकांच्या दाव्याला बळ देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता ठाणेकर विरुद्ध डोंबिवलीकर असे राजकारण रंगण्याची शक्यता आहे. (Covid vaccination in Thane and kalyan dombivli region)

ठाणे महानगरपालिकेला कोरोना लसीचे तीन हजार डोस उपलब्ध झाले होते. मात्र, यापैकी बहुतांश लसी ठाण्याच्या वाट्याला जाताना दिसत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत केवळ एकच लसीकरण केंद्र चालवण्यात येणार आहे. तर कल्याण पूर्व आणि डोंबिवली पूर्व-पश्चिमेला कोरोना लसीच्या नव्या खेपेतील एकही डोस मिळणार नाही. एकीकडे सरकार म्हणते राजकारण करू नका. मग हे राजकारण नाही तर काय आहे, असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी ट्विट करून या अन्यायाला वाचा फोडली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना या सगळ्यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

राजेश टोपेंनी जालना जिल्ह्यासाठी नियोजित कोट्यापेक्षा अधिक लसी नेल्याचा आरोप

केंद्राकडून मिळालेल्या 26.77 लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?, अशा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता.

‘केंद्राकडून येणारी मदत फक्त पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जातेय’

महाराष्ट्र हा सध्या देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र बनला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा पुरवत आहे. मात्र, या मदतीचे योग्यप्रकारे वाटप होत नाही. ऑक्सिजन (Oxygen) आणि रेमडेसिविरचा जास्तीत जास्त साठा पॉवरफूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच जात आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील लोकांवर अन्याय होत असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

संबंधित बातम्या:

केंद्राकडून येणारा ऑक्सिजन, रेमडेसिविरचा साठा फक्त पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जातोय; फडणवीसांचा आरोप

टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे?

(Covid vaccination in Thane and kalyan dombivli region)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.