AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक जिंकायची कशी?; जयंत पाटलांनी दिला वसईकरांना कानमंत्र

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वसई येथून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने वसईत आलेल्या जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (rashtrawadi parivar samvad yatra reached at vasai, jayant patil addressed party worker)

निवडणूक जिंकायची कशी?; जयंत पाटलांनी दिला वसईकरांना कानमंत्र
jayant patil
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 3:50 PM
Share

वसई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वसई येथून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने वसईत आलेल्या जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक मतदारसंघात पक्ष वाढवा. बाहेर शत्रू मोठा आहे. त्यामुळे गाफिल राहू नका. एक एक माणूस जोडा. प्रत्येक घटकापर्यंत पोहोचा, राष्ट्रवादीचा विचार त्यांच्यापर्यंत न्या. तरच आपण निवडणुका सक्षमपणे जिंकू शकू, असा कानमंत्रच जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाची सुरूवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज कोकण विभागातील वसई येथून केली. यावेळी त्यांनी वसई-विरार कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा कानमंत्र दिला. आपला पक्ष प्रत्येक वॉर्डात… प्रत्येक मतदारसंघात वाढला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण आपल्या पंखाखाली घ्यायला हवे. त्यांच्या विचारांशी समन्वय साधायला हवा. ही नवी पिढीच इथे बदल घडवेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

तुमची रणनीती तयार करा

आपला पक्ष म्हणजे शरद पवारसाहेबांचा एक विचार आहे. हा विचार भक्कम व्हायला हवा. यासाठी मी आणि माझे सहकारी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. मतांची बेरीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमची रणनीती तयार करा, तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे, मला तुमच्याकडून चांगला निकाल पाहिजे. बाहेर शत्रू मोठा आहे, त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी आपल्याला ताकद उभारावी लागेल ही खूणगाठ मनाशी बांधा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

किल्ला लढवणे सोपे नाही

वसई-विरार, नालासोपारा हा भाग एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी इथल्या लोकांनी मोठे योगदान दिलेय. या भागात सर्व समाजाचे, सर्व भाषिक लोक राहतात, त्यामुळे इथे सर्वांना सोबत घेऊन राजकारण करावं लागेल, असे स्पष्ट मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. इथे किल्ला लढवणे सोपे नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत हे कौतुकास्पद आहे. हळूहळू का होईना इथे पक्ष वाढेल, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड,आमदार सुनील भुसारा,वसई- विरार शहराध्यक्ष राजाराम मुळीक, निरीक्षक आनंद ठाकूर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, एलजीबीटी प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील,महिला निरीक्षक सुनिता देशमुख,युवक शहराध्यक्ष योगेश पंधरे,महिला शहराध्यक्ष मेघा म्हात्रे,अश्विनी गुरव, युवती शहराध्यक्ष करिष्मा खामकर,विद्यार्थी शहराध्यक्ष मनिष वर्मा,विद्यार्थी राज्य समन्वयक शुभम जटाळ आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

VIDEO: जरंडेश्वरसह कोणता कारखाना कधी, कुणाला आणि कितीला विकला?; अजित पवारांनी सादर केली जंत्री

प्रभागातील समस्यांसाठी आता प्रभाग अधिकाऱ्यांना भेटा, मनापकडून 9 पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती, वाचा कोणत्या प्रभागात कोण अधिकारी?

आगीला जबाबदार कोण? फायर सिस्टम बंद, महापौर म्हणतात, सोसायटी मॅनेजमेंट, सिक्युरिटीवर कारवाई होणार

(rashtrawadi parivar samvad yatra reached at vasai, jayant patil addressed party worker)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.