Sameer Wankhede : समीर वानखेडेंची ठाणे कोपरी पोलिसांनी केली तब्बल आठ तास चौकशी

समीर वानखेडे यांचे नवी मुंबई येथील वाशी भागात सद्गुरु बार आणि रेस्टॉरंट आहे. वानखेडे यांनी बारचा परवाना 1997 मध्ये काढला होता. परंतु त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्ष होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर विभागाने त्यांच्याकडून खुलासा मागविला होता.

Sameer Wankhede : समीर वानखेडेंची ठाणे कोपरी पोलिसांनी केली तब्बल आठ तास चौकशी
समीर वानखेडेंची ठाणे कोपरी पोलिसांनी केली तब्बल आठ तास चौकशी
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:41 PM

ठाणे : तत्कालीन एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची ठाणे (कोपरी) पोलिसांनी तब्बल आठ तास चौकशी केली. कोपरी पोलीस ठाण्यात बारचा परवाना (Bar license) प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने ही चौकशी करण्यात आली. याबाबत माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अधिक भाष्य करता येणार नसल्याचे सांगितले. जे काही सांगायचे ते पोलिसांना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट करून चौकशीत सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. तर या प्रकरणी 5 ते 6 पाणी जबाब कोपरी पोलिसांनी समीर वानखेडे याचा नोंदवला आहे. वानखेडे यांनी पोलिसांना सहकार्य केले असून काही प्रश्न पोलिसांनी विचारले त्या वर समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. आवश्यकता वाटली तर वानखडे यांना पोलिस बोलावणार तसेच गुन्ह्याच्या तपासात जे काही सिद्धी होईल त्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे देखील कोपरी पोलिसांनी तोंडी माहिती दिली आहे. (Sameer Wankhede was interrogated by Thane Kopari police for eight hours)

समीर वानखेडे यांचे नवी मुंबई येथील वाशी भागात सद्गुरु बार आणि रेस्टॉरंट आहे. वानखेडे यांनी बारचा परवाना 1997 मध्ये काढला होता. परंतु त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्ष होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर विभागाने त्यांच्याकडून खुलासा मागविला होता. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणाची सुनावणी होऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांचा बारचा परवाना रद्द करण्यात आला.

वानखेडे यांच्याविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा

दरम्यान,याप्रकरणी शनिवारी (19 फेब्रुवारी) उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वानखेडे यांच्या विरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारचा परवाना मिळविण्यासाठी वानखेडे यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास आता कोपरी पोलिसांकडून सुरू असून वानखेडे यांची आठ तास चौकशी करण्यात आली. (Sameer Wankhede was interrogated by Thane Kopari police for eight hours)

इतर बातम्या

विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीकडून 18 हजार कोटी वसूल केले; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

Chandrapur Murder : आधी आजोबाची हत्या केली, मग मृतदेह अंगणात पुरला; तब्बल 45 दिवसांनी असा झाला घटनेचा उलगडा

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.