AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Rain | ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले

सध्या ठाण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. 

Thane Rain | ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले
rain
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 8:58 AM
Share

ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोकण परिसरात पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. यामुळे ठाण्यातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या  गाड्यांचा वेग मंदावला आहे. येत्या काही तासात मुंबईसह ठाण्यात पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे. (Thane Heavy Rain waterlogging in city)

ठाणे शहरात सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. तसेच येत्या तीन ते चार दिवस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या ठाण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

सखल भागात पाणी साचले

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसाचा फटका ठाण्यातील वंदना एसटी डेपो परिसरात देखील बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहनं ही मागे परतत आहे. तर काही वाहने ही पाण्यात अडकून पडली आहेत.

यंदा ठाणे महापालिकेने नालेसफाई नीट न केल्यामुळे अनेक भागात पाणी साचत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे पावसाचा जोर असाच राहिला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा सकल भागात पालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम पंप बसवणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हवामान खात्याकडून सर्तकतेचा इशारा

तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीचा वेग मंदावला आहे. आज अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात गाड्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. तसेच हवामान खात्याने आधीच सर्तकतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच बसून राहावे, असे आवाहन केले जात आहे.

मुंबई, ठाण्यासह रायगडला रेड अलर्ट

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain) बरसण्याची शक्यता आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Thane Heavy Rain waterlogging in city)

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: येत्या 4 तासांत मुंबई,ठाणे, रायगडात अतिवृष्टीची शक्यता; सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा

Weather Alert: रायगड, नवी मुंबईत अतिवृष्टीचा धोका टळला; ठाण्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain Live Updates | मान्सूनचे आगमन, मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?