महिला व बालकल्याण समितीच्या योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळणार : नरेश म्हस्के

महिला व बालकल्याण समितीच्या योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळणार : नरेश म्हस्के
शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट
Image Credit source: टीव्ही 9

प्रशासनावर जवळजवळ 12 कोटीचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. परंतु या योजनांचा लाभ निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती व समाजातील उपेक्षित किन्नर नागरिकांना देखील होणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. योजनांसाठी वाढीव तरतूद केल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार व्यक्त केले आहे.

गणेश थोरात

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 30, 2022 | 9:37 PM

ठाणे : महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट (Administrative Reign) लागू झालेली आहे. लोकप्रतिनिधी हे नेहमीच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतात. ठाणेकरांच्या मागणीसाठी आज शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत महिला व बालकल्याण समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी निश्चित केलेल्या संख्येपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. परंतु गरजू असलेल्या कोणत्याही अर्जदाराला अनुदानापासून वंचित न ठेवता सर्वांना या योजनांचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व महापालिका आयुक्तांना दिले. आयुक्तांनी शिष्टमंडळाची मागणी मान्य केली असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सांगितले. (Thane shivsena delegation including former Shiv Sena corporators met Municipal Commissioner Dr. Vipin Sharma)

एकूण 24 हजार नागरिकांना या विविध योजनांचा लाभ मिळणार

यासाठी प्रशासनावर जवळजवळ 12 कोटीचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. परंतु या योजनांचा लाभ निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती व समाजातील उपेक्षित किन्नर नागरिकांना देखील होणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. योजनांसाठी वाढीव तरतूद केल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार व्यक्त केले आहे. या योजनांमधून एकूण 14 हजार 854 नागरिकांना लाभ मिळणार होता. परंतु शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे यासाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जाचा विचार करावा अशी मागणी शिष्टमंडळाने मांडली. त्यामुळे आता एकूण 24 हजार नागरिकांना या विविध योजनांचा लाभ मिळणार असून सदर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँकखात्यात जमा होणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

प्रशासकीय राजवटीमध्येही शिवसेनेच्या खाक्या दाखवू

तसेच ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागली असल्याने महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालये प्रशासनाकडून सील केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला एसी कॅबिनची गरज नसून शिवसैनिक म्हणून अजूनही रस्त्यावर उतरून काम आम्ही करत आहे. जनतेच्या कामांसाठी महापालिकेत आम्ही येणारच, सामंजस्याने प्रश्न सुटला नाही तर प्रशासकीय राजवटीमध्येही शिवसेनेच्या खाक्या दाखवू असा इशाराच माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिला आहे. (Thane shivsena delegation including former Shiv Sena corporators met Municipal Commissioner Dr. Vipin Sharma)

इतर बातम्या

कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले, रेल्वे पोलिसांची कारवाई

मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, आंबिवली स्थानकातील धक्कादायक प्रकार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें