अंबरनाथ, बदलापूरमध्ये मोफत लसीकरणाचा धडाका; शिवसेना, राष्ट्रवादीचा पुढाकार

अंबरनाथ आणि बदलापुरात विक्रमी लसीकरण पार पडलं आहे. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीकडून 3 हजार नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. (vaccination drive start in ambernath and badlapur)

अंबरनाथ, बदलापूरमध्ये मोफत लसीकरणाचा धडाका; शिवसेना, राष्ट्रवादीचा पुढाकार
vaccination
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 10:11 AM

अंबरनाथ: अंबरनाथ आणि बदलापुरात विक्रमी लसीकरण पार पडलं आहे. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीकडून 3 हजार नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. तर बदलापूरमध्ये शिवसेनेने अवघ्या 12 दिवसात 21 नागरिकांचं लसीकरण केलं आहे. दोन्ही ठिकाणी मोफत लसीकरण करण्यात येत असून त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (vaccination drive start in ambernath and badlapur)

अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं मोफत लसीकरण मोहीम सुरू केलं आहे. या लसीकरण मोहिमेत 3 हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे. राष्टवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांनी या मोहिमेचं आयोजन केलं आहे.

मनसेची मोहीम

अंबरनाथ शहरात सरकारी लसीकरण मोहीम सुरुवातीपासून संथगतीने सुरू आहे. शहरात ऑर्डनन्स हॉस्पिटल आणि छाया उपजिल्हा रुग्णालय अशा दोन ठिकाणी सरकारी लसीकरण केंद्र आहेत. मात्र लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे साडेतीन लाख लोकसंख्येच्या अंबरनाथ शहरात आतापर्यंत ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये 45 हजार 544 आणि छाया हॉस्पिटलमध्ये 15 हजार 673३ अशा एकूण 59 हजार 529 नागरिकांचंच लसीकरण करण्यात आलं आहे. त्यातही पहिला डोस झालेले 40 हजार 984, तर दुसरा डोस पूर्ण झालेल्यांची संख्या अवघी 19 हजार 263 इतकीच आहे. त्यामुळं शहरात खासगी लसीकरण मोहिमा राबवण्याची गरज निर्माण झाली होती. त्यात मनसेनं खासगी लसीकरणाचा श्रीगणेशा केला. मात्र तिथे 780 रुपयांची कोव्हीशील्ड लस 500 रुपयांना दिली जात आहे.

मनसेनंतर राष्ट्रवादीचा पुढाकार

आता राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेच्या चार पावलं पुढे जात 780 रुपयांची कोव्हीशील्ड लस थेट मोफत उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांच्या वतीने लोकनगरी परिसरात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते या मोहिमेचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किसनराव तारमळे, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिला जिल्हाध्यक्षा, विद्या वेखंडे अश्विनी सचिन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीने शहरात राबवलेल्या या उपक्रमाचं आनंद परांजपे यांनी कौतुक केलं. तर आपण या मोहिमेतून 3 हजार नागरिकांचं लसीकरण करणार असल्याचं सदाशिव पाटील यांनी सांगितलं.

बदलापुरात लसीकरण

बदलापुरात शिवसेनेने राबवण्यात येत असलेल्या खासगी लसीकरण मोहिमेनं नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कारण अवघ्या 12 दिवसांच्या कालावधीत या मोहिमेत तब्बल 21 हजार नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलंय. त्यामुळं ही लसीकरण मोहीम ठाणे जिल्ह्यातलीच नव्हे, तर संपूर्ण राज्यातली सर्वात मोठी खासगी लसीकरण मोहीम ठरली आहे.

असं होतं लसीकरण

बदलापूर शहरात सरकारी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी, तिथे असलेला लसींचा तुटवडा लक्षात घेत बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंच्या वतीने जून 2021 मध्ये खासगी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल आणि मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलच्या सहकार्यानं ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत दर शनिवारी बदलापूर शहरातील दोन ठिकाणी लसीकरण शिबिरं आयोजित करण्यात येतायत. ज्यामध्ये 780 रुपयांची कोव्हीशील्ड ही लस 500 रुपयात दिली जाते, तर वरचे 280 रुपये हे वामन म्हात्रे यांच्याकडून भरले जातात. 16 जूनपासून सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेचा 28 ऑगस्ट रोजी 12 वा शनिवार होता. या 12 दिवसांच्या कालावधीत शिवसेनेकडून थोड्या थोडक्या नव्हे, तर तब्बल 21 हजार नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येकी 280 रुपये याप्रमाणे 58 लाख 80 हजार रुपये वामन म्हात्रे यांनी भरले आहेत. तर या एकूण मोहिमेवर आतापर्यंत वामन म्हात्रे यांनी स्वखर्चाने तब्बल 90 लाख रुपये खर्च केले आहेत.

लसीकरण नियोजनबद्ध

मात्र शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिकवणीप्रमाणे बदलापूर शहर कोरोनमुक्त करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं वामन म्हात्रे सांगतात. ही मोहीम यापुढे ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवली जाणार असून त्यातून एकूण 30 हजार नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं वामन म्हात्रे यांचं उद्दिष्ट आहे. एकीकडे सरकारी लसीकरण केंद्रांवर अक्षरशः रात्रीपासून रांगा लावाव्या लागतात. त्यातही राजकीय वशिलेबाजी आणि लसींचा तुटवडा अशा गोष्टींमुळे अनेक तास नागरिकांना रांगेत उभं राहावं लागतं. त्यानंतरही लस मिळेलच याची शाश्वती नसते. मात्र शिवसेनेच्या या लसीकरण मोहिमेत सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून त्याचा नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचं आणि गैरसोय टळत असल्याचं इथे लसीकरणासाठी आलेले नागरिक सांगतात. काहींनी तर 780 रुपयांची लस 780 रुपयांना देत फुकटची चमकोगिरीही करून घेतली. तर काहींना वामन म्हात्रे यांच्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवणं परवडत नसल्यानं त्यांनी या मोहिमेवर आरोपही केले. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या खिशातून लाखो रुपये खर्च करत बदलापूर शहराच्या कोरोनमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या वामन म्हात्रे यांचं बदलापूरकर कौतुक करत आहेत. (vaccination drive start in ambernath and badlapur)

संबंधित बातम्या:

काँग्रेसनंतर आता राष्ट्रावादीचाही कोल्हापुरात स्वबळाचा नारा, स्थानिक स्वराज्यसंस्थांसह 10 विधानसभा लक्ष्य

VIDEO : फाडफाड इंग्रजी बोलतो, डोक्यावर बॉटल आणि उलटी चाल, नागपुरात व्हायरल भिकाऱ्याची जोरदार चर्चा

सूटकेसमधील मृतदेहाचे गूढ टॅटूमुळे उकलले, तरुणाच्या हत्येप्रकरणी पत्नीसह सासूला अटक

(vaccination drive start in ambernath and badlapur)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.