नागपूर : नागपुरात उलटं चालणाऱ्या एका भिकाऱ्याची सध्या जोरात चर्चा आहे. हा भिकारी डोक्यावर बॉटल ठेऊन उलटा चालतो, फाडफाड इंग्रजी बोलतो आणि भर रस्त्यात एका पायावर उभा राहून योगा करतो. नागपूर शहरात या अनोख्या भिकाऱ्याची सध्या जोरात चर्चा आहे. रस्त्यावर ये जा करणारे लोक क्षणभर थांबतात आणि या उलटा चालणाऱ्या आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या भिकाऱ्याकडे बघतात. हा व्हायरल भिकारी सध्या नागपूरकरांच्या कुतुहलाचा विषय ठरतोय. पाहूया एका एनोख्या व्हायरल भिकाऱ्यावर ‘टीव्ही 9 मराठी’चा हा स्पेशल रिपोर्ट.