Pune : निमगाव दावडीत कालवा फुटला, सर्वत्र पाणीच-पाणी, वाहतूकही विस्कळीत..!

कालवा फुटल्याने केवळ शेती पिकांचेच नुकसान असे नाही तर साठलेले पाणी येथील दावडी-राजगुरुनगर मार्गावरही आले होते. पाण्याचा प्रवाह अधिकचा असल्याने या मार्गावरील वाहतूक ही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही झाली होती. अचानक कालव्यातील पाणी लगतच्या परिसरात आणि शेत शिवरात झाल्याने येथील चित्र हे वेगळेच होते.

Pune : निमगाव दावडीत कालवा फुटला, सर्वत्र पाणीच-पाणी, वाहतूकही विस्कळीत..!
सांकेतिक छायाचित्र
सुनिल थिगळे, प्रतिनिधी

| Edited By: राजेंद्र खराडे

Aug 21, 2022 | 5:03 PM

पुणे : पुणेच नाहीतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून (Rain) पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे (Kharif Season) खरीप हंगामात सध्या शेती मशागतीची कामे सुरु आहेत. असे असले खरिपावरील संकट काही दूर झाले नाही. कोणत्या ना कारणाने पिकांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथे चासकमान (Left Canal) धरणाचा डावा कालवा फुटला आहे. त्यामुळे या परिसरात पाणीच-पाणी अशी स्थिती निर्माण झाली असून आता या कालव्यात पाणीसाठा राहतो की नाही अशी आवस्था आहे. कालव्यातील पाणी रस्त्यावर आणि शेत जमिनीत घुसल्याने खरीप हंगामातील पिकांवर पुन्हा संकट ओढावले आहे. अचानक ही घटना घडल्याने पाण्यावर नियंत्रण मिळवणेही मुश्किल झाले आहे. केवळ पाण्याचाच अपव्ययच नाहीतर या भागातील वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली होती.

शेतीसाठी महत्वाचा कालवा

खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथील हा चासमास धरणावरील डावा कालवा हा शेती सिंचनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. सध्या सर्वत्रच मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट नसले तरी उन्हाळ्यात याच कालव्यातील पाण्याचा आधार खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना असतो. मात्र, आता अचानक कालवाच फुटल्याने पुन्हा कालव्यात पाणीसाठा होईल का नाही याबाबत शंका आहे. याच कालव्याचा आधार शेतीसह लगतच्या गावातील ग्रामस्थांना होता. भविष्यातील रब्बी पिकांचे काय होणार याची चिंता या परिसरातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

वाहतूकही ठप्प

कालवा फुटल्याने केवळ शेती पिकांचेच नुकसान असे नाही तर साठलेले पाणी येथील दावडी-राजगुरुनगर मार्गावरही आले होते. पाण्याचा प्रवाह अधिकचा असल्याने या मार्गावरील वाहतूक ही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही झाली होती. अचानक कालव्यातील पाणी लगतच्या परिसरात आणि शेत शिवरात झाल्याने येथील चित्र हे वेगळेच होते.

हे सुद्धा वाचा

शेतशिवारात पाणी साचले

कालव्यातील पाण्याचा उपयोग हा शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी होत असत. खरिपातील पिके ही पावसाच्या पाण्यावर आणि रब्बीतील पिकेही कालव्यातील पाण्यावर असे गणित या भागातील शेतकऱ्यांचे होते. पण आता कालवा अचानक फुटल्याने खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण भविष्यातील पिकांना पाणी द्यायचे कसे असा सवाल आहे. दावडी येथील शेत शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें