देश सर्वात मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? शरद पवारांनाही लागली चाहुल, तातडीने पत्रकार परिषद घेत मोदींकडे सर्वात मोठी मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधनाची बचत करण्याचं आवाहान केलं आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

देश सर्वात मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? शरद पवारांनाही लागली चाहुल, तातडीने पत्रकार परिषद घेत मोदींकडे सर्वात मोठी मागणी
sharad pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 14, 2026 | 5:41 PM

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. जरी युद्धविराम झाला असला तरी देखील होर्मूजच्या सामुद्रधुनीमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूजची खाडी तेल वाहतुकीसाठी बंद आहे. तसेच मध्य पूर्वेतून भारतात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. पुन्हा एकदा देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोल-झिडेलचा तुटवडा जणवू लागला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोठं आवाहन  केलं होतं. ज्यामध्ये इंधनाची बचत करा, पेट्रोल, डिझेल जपून वापरा, खाद्य तेलाचा वापर जपून करा, वर्षभर सोनं खरेदी करू नका, परदेशात सध्या पर्यटणासाठी जाऊ नका असं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला गांभीर्याने घ्या, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील देश अशा प्रकारच्या आव्हानाला सामोरं गेला आहे.  जर देशात बिकट परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर मोदी यांनी केलेल्या आवाहानाला गांभीर्याने घ्या, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे, काहींनी तर इलेक्ट्रिक वाहनं वापरण्यास देखील सुरुवात केली आहे. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधिंनी यात सातत्य ठेवावं, हा नुसता दिखावा ठरू नये, असं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.  देशासमोर गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या बैठकीला उपस्थित राहावं अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us