Nashik: महाभयंकर, पुलावरून ट्रक थेट नदीत…!

तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत, इतका भयंकर अपघात नाशिक जिल्ह्यातल्या निफाड येथील कादवा पुलावर घडला. सोमवारी  (13 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास एक ट्रक चक्क नदीत कोसळला.

Nashik: महाभयंकर, पुलावरून ट्रक थेट नदीत...!
निफाड येथील कादवा पुलावरून ट्रक थेट नदीत कोसळला.

नाशिकः तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत, इतका भयंकर अपघात नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या निफाड (Nifad) येथील कादवा (Kadwa bridge) पुलावर घडला. सोमवारी  (13 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास एक ट्रक चक्क नदीत कोसळला. मात्र, ट्रक चालकाचे आणि आतील व्यक्तींचे दैव बलवत्तर म्हणून ते बालंबाल बचावले. चालकाचे ट्रकवरील (एम. एच. 17 जी. वाय. 6253) नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. यात जीवित हानी झाली नाही. मात्र, ट्रकचा चुराडा झाला आहे. ट्रकच्या अपघाताची बातमी समजताच सकाळी परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, हा पूल अपघाती म्हणून ओळखला जातो. यापूर्वी येथे अनेकांचा जीव गेला आहे. (the truck fell into the river from the nashik district bridge)

ट्रकला दिली मागून धडक

चांदवडहून धुळ्याला जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मालेगाव – धुळे रस्त्यावर मध्यरात्री एक वाजता अपघाती मृत्यू झाला. मालेगाव धुळे रस्त्यावरील हॉटेल ग्रीन प्लाझा समोर काही दिवसांपूर्वी हा अपघात घडला. दुचाकीस्वाराने चालत्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्यात गंभीर मार लागल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीस्वारांचे अपघात सत्र

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्याची मोहीम सुरू केली आहे. या उपदेशाच्या डोसानंतर त्यांना एक प्रमाणपत्रही दिले जात आहे.

वाहतूक नियमांचे पालन नाही

नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. (the truck fell into the river from the nashik district bridge)

इतर बातम्याः 

Nashik is the best: लसीकरणाचा वारू चौखुर, अबब…25 लाख व्यक्तींनी घेतले डोस!

NashikGold: स्वस्त हो स्वस्त, सोने 100 तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त!

नाशिक जिल्ह्यात 820 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, 3 लाख 97 हजार 268 ठणठणीत

नाशिक-पुणे आता पावणेदोन तासात, सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुसाट, 64 गावांतील मोजणी पूर्ण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI