AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर महागळती सरकार, लीकेज सरकार आहे – उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झालं. पेपरही लिक होत आहे. यांना लाज लज्जा शरम नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

हे तर महागळती सरकार, लीकेज सरकार आहे - उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 27, 2024 | 1:20 PM
Share

हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झालं. पेपरही लिक होत आहे. यांना लाज लज्जा शरम नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय-बाय सरकार म्हणत आहे. साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. पण गेल्या दोन वर्षांत केलेल्या कोणत्याही घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. या सरकारला जरा जरी संवदेना असतूल तर गेल्या दोन वर्षांत जो घोषणांचा पाऊस पाडला त्यापैकी पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने सांगितलं तरी खूप आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अर्थसंकल्पाबद्दलही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. उद्याचा घोषणांचा पाऊस पडेल. तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही. घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली हे खरेपणाने सांगितलं पाहिजे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाही, असं शिंदे म्हणाले होते. त्यांची पंचतारांकीत शेती आहे. अमावस्या पौर्णिमेला वेगळं पिक काढतात. हेलिकॉप्टरने ते जातात हा एकमेव शेतकरी. टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस नाही . दोन वर्षात सव्वा सहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. रोज नऊ शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यांना कोणी वाली नाही. १० हजार २२ कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी आहे. त्यांनी कितीही आव आणला तरी प्रत्यक्षात परिस्थितीवेगळी आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे येणं बाकी आहे. जानेवारीपासून आता पर्यंत १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

पीक विमाचे पैसे मिळत नाही. एक रुपयात पिकविम्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या हातात ७० रुपये आले आहेत. शेपटावर निभावलं. कसंबसं एनडीए सरकार आलं. डबल इंजिन सरकारने पीक कर्जाची माफी द्यावी. मी दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची रक्कम माफी दिली होती. घोषणा आणि थापा मारू नका. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून निवडणुकीच्या आत माफी द्यावी. फडणवीस यांनी एक कर्जमुक्ती केली. तिची अंमलबजावणी अजून नाही.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल