कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, आता मुंबई-पुण्यातून येणाऱ्यांना प्रवेश नको : पालकमंत्री

मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमधून येणाऱ्यांना कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही. (No Entry in Kolhapur from mumbai pune) अत्यावश्यक असेल तरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच प्रवेश दिला जाईल.

कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, आता मुंबई-पुण्यातून येणाऱ्यांना प्रवेश नको : पालकमंत्री
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 7:29 PM

कोल्हापूर : मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत (Satej Patil demands Don’t give entry in Kolhapur) आहे. आज पुन्हा जिल्ह्यात 7 रुग्णांची नोंद झाली असून सर्व रुग्ण मुंबईवरुन प्रवास करुन कोल्हापुरात आले आहेत. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात 19 नवे कोरोना रुग्ण सापडले असून यातील तब्बल 17 जणांचं मुंबई कनेक्शन आहे. या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. (Satej Patil demands Don’t give entry in Kolhapur)

त्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमधून येणाऱ्यांना कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही. अत्यावश्यक असेल तरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

लॉकडाऊन वाढणार असल्यानं पुणे, मुंबईसह राज्यभरात असलेले कोल्हापूरवासिय आपल्या जिल्ह्यात येत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताण वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख लोकांनी प्रवेश केला आहे.. जिल्ह्याबाहेरील तब्बल सहाशे गाड्या जिल्ह्यात आल्या असून त्यातील चारशेहून अधिक गाड्या मुंबईहून आलेल्या आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 21 रुग्ण मुंबईवरुन आलेले आहेत. बाहेरील लोकांमुळे जिल्ह्यातील वाढणारा कोरोनाचा आकडा चिंताजनक बनला आहे. अद्याप 20 हजार लोकांनी केलेले अर्ज प्रलंबित आहेत. रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना सक्तीन क्वारंटाईन केलं जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटर देखील हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईमधील लोकांना आता कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशाला परवानगी देऊ नये अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.

“कोरोनाच्या काळात प्रत्येकाला आपापल्या घरी जाण्याची ओढ आहे.पण, मुंबई, पुणे व अन्य रेड झोनमधून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की,आपण जिथे आहात तिथे आपली व्यवस्था असेल तर कृपया आपण तिथेच राहून काळजी घ्यावी. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमानुसार आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून रेड झोनमधून येणाऱ्यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यानंतरच या लोकांना त्या त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी यांनी प्रवास पास द्यावेत, अशीही मागणी केली आहे. याबाबत कोणीही कृपया गैरसमज करून घेऊ नये.यामुळे रेड झोनमधून येणाऱ्या या नागरिकांची तपासणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याचे नियोजन आम्हाला व्यवस्थित करता येईल.”, असं सतेज पाटील म्हणाले. 

(Dont give entry in Kolhapur)

Non Stop LIVE Update
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.