AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत समुद्राला उधाण; चार ते पाच मीटर उंच लाटा, पुण्यात वेळेआधीच मान्सून दाखल

महाराष्ट्रात मंगळवारी अनेक ठिकाणी पाऊस होता. मुंबईत समुद्राला भरती आल्याने चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्या. पुण्यात मान्सूनने नवीन विक्रम केला. १९६२ नंतर मान्सून २६ मे रोजी पोहचला. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी उतरली. त्यामुळे दिलासा मिळाला.

मुंबईत समुद्राला उधाण; चार ते पाच मीटर उंच लाटा, पुण्यात वेळेआधीच मान्सून दाखल
मुंबईत समुद्राला भरती आली. (फाईल फोटो) Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 27, 2025 | 2:36 PM
Share

मुंबईत मंगळवारी समुद्राला मोठी भरती आली. चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्याने समुद्राचे रौद्रस्वरूप पाहायला मिळाले. लाटा पाहण्यासाठी मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी केली. मरीन ड्राईव्ह, जुहू, गेटवे परिसरात मुंबई पालिकेचा बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पावसाने थोडी उघडीप दिली आहे. परंतु विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाचा महालक्ष्मी रेसकोर्सलाही फटका बसला होता. महालक्ष्मी रेसकोर्सला तळ्याचे स्वरूप आले. संपूर्ण मैदानात पाणी साचले. घोड्यांची शर्यत होणारा ट्रॅकही पाण्याखाली गेला आहे.

चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल

चिपळूणमध्ये पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. ऑगस्टपर्यंत चिपळूणमध्ये एनडीआरएफचे जवान राहणार आहे. चिपळूणमधील शासकीय निवासस्थान परिसरात एनडीआरएफची टीम तैनात राहणार आहे.

सांगलीत कृष्णेची पातळी उतरली

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदी पात्रामध्ये वाढ झाली होती. काल सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी ही 16 फुटांवर पोचली होती. मात्र आज कृष्णाची पातळी ही जवळपास 15 फुटांपर्यंत आली आहे. एक फुटांनी कृष्णेची पातळी उतरली आहे. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र कृष्णा आणि वारणा नदीपात्रावरील चार बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत. तर जिल्ह्यातील शेतीमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्रही पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

पुण्यात मान्सून १९६२ नंतर मान्सून लवकर

राज्यात तळकोकणात ३५ वर्षांनंतर वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने पुण्यात सुद्धा नवीन विक्रम केला आहे. पुण्यात मान्सून यापूर्वी १९६२ मध्ये २९ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर यंदाच मान्सून २६ मे रोजी पुण्यात दाखल झाला. राज्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत राज्याच्या अन्य भागातही मान्सून पोहचणार आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली होती.

गेल्या १० वर्षात मान्सूनचे पुण्यातील आगमन (वर्ष आणि तारीख)

  • २०१५: १२ जून
  • २०१६: २० जून
  • २०१७: १२ जून
  • २०१८: ९ जून
  • २०१९: २४ जून
  • २०२०: १४ जून
  • २०२१: ६ जून
  • २०२२: ११ जून
  • २०२३: २४ जून
  • २०२४: ९ जून
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.