EVM वरील एका शब्दाने सगळा खेळच बदलला, उमेदवाराला फुटला घाम; नेमकं काय घडलं?
टिटवाळा प्रभाग क्रमांक ३ मध्ये ईव्हीएम मशीनवर उमेदवार शेखर वाकोडे यांचे नाव 'शेख' असे चुकीचे छापल्याने गोंधळ उडाला असून निवडणूक रद्द करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. त्यातच आता टिटवाळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावात मोठी चूक झाल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शेखर अप्पाराव वाकोडे यांचे नाव चक्क शेख अप्पाराव वाकोडे असे छापून आल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमके प्रकरण काय?
टिटवाळ्यातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. टिटवाळ्यातील शरद पवार गटाचे उमेदवार शेखर वाकोडे स्वतः मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना ईव्हीएम मशीन आणि बाहेर लावलेल्या अधिकृत यादीवर त्यांचे नाव चुकीचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचे नाव शेखर ऐवजी शेख असे लिहिण्यात आले होते. यामुळे त्यांची जात आणि धर्म बदलल्यासारखा प्रकार घडला आहे. यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे.
Municipal Election 2026
Nagarsevak Election 2026 : शाई पुसून मतदान करता येणार नाही- राज्य निवडणूक आयोग...
Maharashtra Municipal Election 2026 : दानवेला अक्कल नाही... चंद्रकांत खैर यांचा चढला पारा...
BMC Election 2026 Voting : मशाल चिन्हासमोरील बटण दाबलं जात नसल्याचा आरोप
BMC Election 2026 Voting : मुंबईत 11.30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?
Maharashtra Election Voting Percentage : छत्रपती संभाजीनगरमध्ये किती मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क?
Maharashtra Election Voting Percentage : अहिल्यानगर महानगरपालिकेत किती टक्के मतदान ?
या संदर्भात शेखर वाकोडे यांनी संताप व्यक्त केला. मी गेल्या पाच वर्षांपासून या भागात जनसंपर्क ठेवून मेहनत केली आहे. मात्र, ईव्हीएमवर आणि केंद्राबाहेरील डिस्प्लेवर माझे नाव चुकीचे लावून प्रशासनाने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. अनेक मतदार मला फोन करून विचारत आहेत की तुमचे नाव यादीत का नाहीये? मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नाव दुरुस्त करण्याची विनंती केली, मात्र त्यांनी ती फेटाळून लावली. हा माझ्यावर झालेला अन्याय असून या प्रभागातील मतदान प्रक्रिया तात्काळ थांबवून निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी शेखर वाकोडे म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. तपासे म्हणाले, “राज्यात सकाळपासून अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ दिसत आहेत. पण टिटवाळ्यात तर कहरच झाला आहे. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे उमेदवाराची ओळखच बदलली गेली आहे. हा प्रकार जाणूनबुजून केला गेला आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. आम्ही या अन्यायाविरोधात गप्प बसणार नाही. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका (Petition) दाखल करणार असून प्रभाग क्रमांक ३ ची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणार आहोत.”
या प्रभागात भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस असे तगडे उमेदवार रिंगणात आहेत. अशा अटीतटीच्या लढतीत एका प्रमुख उमेदवाराच्या नावाचा असा घोळ झाल्याने निवडणूक निकालावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.