AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol And Diesel Price | 2 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा आजचा दर 84.70 रुपये प्रतिलीटर आहे. (petrol diesel rate current)

Petrol And Diesel Price | 2 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
| Updated on: Jan 15, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : मागील दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानतंर आज (15 जानेवारी) ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा आजचा दर 84.70 रुपये प्रतिलीटर आहे. तर दिल्लीच्या तुलनेत मुंबईत हाच दर 7 रुपयांनी जास्त असून ग्राहकांना पेट्रोलची खरेदी 91.32 रुपये प्रतीलीटरप्रमाणे करावी लागतेय. (todays petrol and diesel rate current update)

मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात जागतिक पातळीवर घट झाली झाली होती. त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत होता. कच्च्या तेलाची निर्मिती करणारा अव्वल क्रमांचा देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट केली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती.

महाराष्ट्रात दर काय?

मात्र आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणातही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलचा आजचा दर 84.70 रुपये प्रतिलीटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर 91.32 रुपये प्रतीलीटर आहे. राज्यामध्ये परभणी जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग असून येथे पेट्रोल 93.73 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 82.70 रुपये प्रतिलीटरप्रमाणे विकले जातेय. बीडमध्ये पेट्रोलचा दर 81.40 रुपये आहे. नागपुरात 91.82 रुपये प्रतिलीटरप्रमाणे पेट्रोल विकले जात आहे. तर डिझेलचा दर 83.16 रुपये प्रतिलीटर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 91.01 रुपये प्रतिलीटर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात डिझेलचा दर कमी कसून 80.08 रुपये प्रतिलीटर आहे.

मुख्य शहरातील पेट्रोलचे आजचे दर

आग्रा – 84.12 रुपये प्रतिलीटर

अहमदाबाद – 84.07 रुपये प्रतिलीटर

अलाहाबाद – 84.38 रुपये प्रतिलीटर

भोपाळ – 92.55 रुपये प्रतिलीटर

चेन्नई – 87.40 रुपये प्रतिलीटर

मुंबई – 91.32 रुपये प्रतिलीटर

दिल्ली – 84.70 रुपये प्रतिलीटर

कोलकाता – 86.15 रुपये प्रतिलीटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर

कोल्हापूर – पेट्रोल – 91.60 रुपये प्रतिलीटर, डिझेल – 80.58 रुपये प्रतिलीटर

पुणे – पेट्रोल – 90.99 रुपये प्रतिलीटर, डिझेल – 80.0 रुपये प्रतिलीटर

बीड – 92.37 रुपये प्रतिलीटर

परभणी – 93.73 रुपये प्रतिलीटर

औरंगाबाद – 92.55 रुपये प्रतिलीटर

नाशिक – 91.76 रुपये प्रतिलीटर

नागपूर – 91.82 रुपये प्रतिलीटर

संबंधित बातम्या :

Petrol And Diesel Price | पेट्रोलचे दर 91 रुपयांच्या पार, डिझेलही महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

कच्च्या तेलाच्या निर्मितीमध्ये सौदी अरेबियाकडून कपात; देशात पेट्रोल, डिझेलचे दर कडाडले

(todays petrol and diesel rate current update)

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.