भाजप कार्यकर्त्यांचा पिंपळगाव टोल नाक्यावर राडा, NHAI च्या अधिकाऱ्यांकडून टोलचा झोल मान्य!

नाशिकच्या पिंपळगाव टोल नाक्यावर चक्क केंद्र सरकारच्या डोळ्यात धूळफेक करत टोल वसूल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर राडा केल्यानंतर NHAI च्या अधिकाऱ्यांनी देखील गेल्या 4 महिन्यांपासून तांत्रिक अडचण असल्याचं मान्य केलं आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा पिंपळगाव टोल नाक्यावर राडा, NHAI च्या अधिकाऱ्यांकडून टोलचा झोल मान्य!
टोल नाका (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 10:29 PM

नाशिक : जिल्हातील रस्ते एकीकडे खड्ड्यात गेलेले पाहायला मिळतात. अशावेळी दुसरीकडे नाशिकच्या पिंपळगाव टोल नाक्यावर चक्क केंद्र सरकारच्या डोळ्यात धूळफेक करत टोल वसूल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर राडा केल्यानंतर NHAI च्या अधिकाऱ्यांनी देखील गेल्या 4 महिन्यांपासून तांत्रिक अडचण असल्याचं मान्य केलं आहे. टोल प्रशासनाने या घोटाळ्याची कबुली दिली असून, परस्पर सॉफ्टवेअरमध्ये बदल करत पैशांची लूट केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. (big scam at Pimpalwadi toll plaza in Nashik)

नाशिकच्या पिंपळगाव टोल नाक्यावर भाजप कार्यकर्त्यांनी धाड टाकत हा प्रकार उघडकीस आणला आहे. टोल नाक्यावरच्या बरोबर दोन लेन मध्येच कॅश स्वीकारली जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप होता. शिवाय केंद्र सरकारने दिलेल्या सॉफ्टवेअर व्यतिरिक्त कंपनी स्वतःचे सॉफ्टवेअर वापरून टोल वसूल करत असल्याचा आरोपही करण्यात येत होता. याबाबत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी थेट दोन पावत्याच दाखवल्या आहेत. गेल्या अनेक दिवसंपासून या दोन लेनमधून जाणाऱ्या गाड्यांचा टोल तर जमा होतो. मात्र, केंद्राच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंदच होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. धक्कादायक बाब म्हणजे टोल नाक्यावर पॅरेलल यंत्रणा काम करत असल्याचा संशय असल्याचं आपण 4 महिन्यांपूर्वीच वरिष्ठांना कळवल्याची सारवासारव NHAI च्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

नेमका प्रकार काय?

मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्यावर गोंदे ते शिरवाडे दरम्यानच्या धावणाऱ्या वाहनांकडून टोल वसूली केली जाते. टोल कलेक्शनची जबाबदारी स्कायलार्क कंपनीकडे सोपवण्यात आलीय. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून वाहन नावाचं सॉफ्टवेअर देण्यात आलंय. टोलनाक्यावरून जेवढी वाहनं जातील त्यांची माहिती वरिष्ठ यंत्रणेला समजते. मात्र, लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारने टोल नाक्याला दररोज ३४ लाखांची सूट दिली होती. याचाच गैरफायदा घेत या टोलवरील २ आणि १४ क्रमांकाच्या लेनमध्ये वाहनऐवजी दुसरंच सॉफ्टवेअर सुरू करत टोलनाका प्रशासन अधिकाऱ्यांनी लूट सुरू केली.

या प्रकारानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत

1. टोल नाक्यावर नेमकी कोणती पॅरेलल यंत्रणा काम करते हे 4 महिन्यांच्या तपासात देखील कळाल नाही काय ?

2. टोल कंपनीला जर यंत्रणा सदोष आहे असा संशय होता, तर टोल वसूल का केला ?

3. कंपनीने टोल नाक्यावर लावलेले केंद्राचे सॉफ्टवेअर हॅक केले का ?

4. NHAI ने याबाबत बोटचेपी भूमिका का घेतली ?

अर्थात याबाबत केंद सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे. मात्र संपूर्ण जिल्हातील नागरिक एकीकडे रस्त्यांवरच्या खड्ड्यातून प्रवास करत असताना, टोलच्या या झोलबाबत काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सक्रिय; 21 सप्टेंबर पासून नाशिक दौऱ्यावर

नाशिकमध्ये मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू; तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार

Big scam at Pimpalwadi toll plaza in Nashik

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.