नाशिकमध्ये मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू; तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार

ऐन महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर नाशिकमधल्या (Nashik) मतदार याद्यांमधील (Voter lists) घोळ उघडकीस आला असून, तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ उडाली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे.

नाशिकमध्ये मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू; तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर नाशिकमधल्या (Nashik) मतदार याद्यांमधील (Voter lists) घोळ उघडकीस आला असून, तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ उडाली आहे. (Confusion in voter lists) ही नावे रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे. (Voter list purification drive launched in Nashik)

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिकमध्ये मात्र ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील दुबार नावाचा मुद्दा गाजतो आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन मतदार संघाच्या याद्यांमध्ये शे-दोनशे नव्हे, तर चक्क तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या पथकाने हा घोळ उघडकीस आणला आहे. त्यांनी तीन महिन्यांत मतदार यांद्याची अक्षरशः छाननी केली. तेव्हा नाशिक पश्चिम मतदारसंधात 1 लाख 22 हजार 242 मतदार दुबार आढले. नाशिक पूर्व मतदारसंघात 88 हजार 932 आणि नाशिक मध्य मतदारसंघामध्ये 76 हजार 319 मतदार दुबार आढळले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे. याअनुषंगाने नागरिकांनी दुबार नावे कमी करण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीमध्ये कोणी जाणीवपूर्वक दुबार नावे सुरू ठेवली असल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा व्यक्तिंविरोधात निवडणूक कायद्या अंतर्गत फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संस्थानी खातरजमा करावी

मोठ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, उद्योग व बांधकाम क्षेत्र यासारख्या ठिकाणी एकाच छत्राखाली अनेक नागरिक कार्यरत असतात. त्यामुळे अशा आस्थापना चालकांनी आपल्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची मतदार यादीत दुबार नाव नोंदणी झालेली नाही याबाबत खातरजमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारीमांढरे यांनी मोठ्या आस्थापना चालकांना केले आहे.

संकेतस्थळावर करा खात्री

मतदार यादीतील दुबार नाव नोंदीच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर व तहसील कार्यालयात कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीबाबत असलेल्या संकेतस्थळ तसेच आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवरून मतदार यादीत आपल्या नावाची दुबार नोंदणी झाली नसल्याची खात्री करावी, असे सांगण्यात आले आहे.

निवडणुकीच्या दृष्टिने मतदार यादी अतिशय महत्त्वाची बाब आहे. मतदार यादी शुद्ध व अद्ययावत असणे आवश्यक असल्याने मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेस सुरूवात करण्यात आली आहे. याअनुषंगाने नागरिकांनी दुबार नावे कमी करण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी (Voter list purification drive launched in Nashik)

इतर बातम्याः

महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सक्रिय; 21 सप्टेंबर पासून नाशिक दौऱ्यावर

‘नासाका’चे बॉयलर पेटणार, खासदार पुत्र गोडसेंकडे सारथ्य जायची शक्यता

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI