AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी

गेल्या आठवड्याभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा (water storage) झाला आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह 11 धरणांवर जमावबंदी (Congestion order) आदेश लागू करण्यात आला आहे.

नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी
पावसाने धरणे भरली.
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 3:39 PM
Share

नाशिकः गेल्या आठवड्याभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा (water storage) झाला आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह 11 धरणांवर जमावबंदी (Congestion order) आदेश लागू करण्यात आला आहे. (78% water storage in 24 dams in Nashik, Congestion order on 11 dams including Gangapur, Darna dams)

नाशिक शहराची तहान गंगापूर धरण भागवते. या धरण समूहाचा पाणीसाठा 95 टक्क्यांवर गेला आहे. दारणा धरणाचा साठा 87 टक्के झाला आहे. वरुणराजाच्या कृपेने जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. पावसाळ्यात सलामीलाच नाशिककडे वक्रदृष्टी करणाऱ्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला यावर्षीचा पहिला पूर आला. मनमाड, नांदगावलाही पावसाने झोडपून काढले. वालदेवीसह अनेक नद्यांना पूर आला. मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरणही भरले. गंगापूर, दारणा, नांदूरमधमेश्वरसह जिल्ह्यातल्या प्रमुख 12 धरणांमधून विसर्ग सुरू होता. आताही सहा धरणांमधून हा विसर्ग सुरू आहे. मात्र, तूर्तास पावसाचा जोर कमी झाल्याने मंगळवारपासून या विसर्गात कपात करण्यात आली आहे. गंगापूर धरणातून 1659 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग आता 553 वर आणण्यात आला आहे. दारणा, कडवा, आळंदी, वालदेवी या धरणातील विसर्गातही कपात करण्यात आली आहे.

ही धरणे काठोकाठ भरली नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.

जळगावलाही दिलासा जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचा साठा हा 60.84 वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे.

मुंबईचा पाणीप्रश्न मिटला

मुंबईकला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे.

इतर बातम्याः

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.