AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neil Somaiya: सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार, नील सोमय्यांचं काय होणार?; उद्या कोर्टात सुनावणी

Neil Somaiya: सेव्ह विक्रांत मोहिमेचा पैसा बळकावल्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोमय्या उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Neil Somaiya: सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार, नील सोमय्यांचं काय होणार?; उद्या कोर्टात सुनावणी
सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार, नील सोमय्यांचं काय होणार?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 11, 2022 | 7:31 PM
Share

मुंबई: सेव्ह विक्रांत (ins vikrant) मोहिमेचा पैसा बळकावल्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या  (Kirit Somaiya) यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोमय्या उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या 12 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नील सोमय्या यांचाही जामीन मिळतो की त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या सकाळीच नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश निर्णय देतील. सेव्ह विक्रांत प्रकरणातील जमा केलेला निधी हडप केल्याचा नील सोमय्या यांच्यावरही आरोप आहे. त्यामुळे त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.

किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टात तीन ते चार तास सुनावणी झाली. यावेळी सोमय्या यांच्या वकिलांनी मोठा दावा केला. राजभवनाचे बँक खाते नसल्याने सोमय्या यांनी हा निधी पक्षाला दिल्याचं सोमय्या यांच्या वकिलाने सांगितलं. तर, त्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार आक्षेप घेतला. सोमय्या यांनी तो निधी तर त्यांच्या पक्षाला दिला असेल तर पक्षाच्या नेत्यांवरही कारवाई करावी लागेल, असं घरत यांनी सांगितलं. यावेळी सोमय्यांच्या वकिलांनी सोमय्या निष्पाप असल्याचं कोर्टाला दाखवण्याचाही प्रयत्न केला.

त्या पैशाचं काय झालं?

मात्र, सोमय्यांनी जमा केलेला पैसा कुठे आहे? त्या पैशाचं काय झालं? सोमय्या यांनी निधी गोळा करण्यासाठी परवानगी नसताना निधी कसा गोळा केला? याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घ्यायचे आहेत. त्यामुळे सोमय्यांची कोठडी हवी असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यानंतर कोर्टाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

नील सोमय्यांचे काय होणार?

दरम्यान, सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या नील सोमय्यांचे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते. सेव्ह आयएनएस विक्रांतच्या नावाखाली सोमय्या यांनी 58 कोटी रुपये जमा केले. त्या पैशाचे बॉक्स त्यांनी त्यांच्या मुलुंडच्या निलम नगरमधील कार्यालयात ठेवले होते. काही बॉक्स एका बिल्डरच्या कार्यालयात ठेवले होते. त्यानंतर हा पैसा नील सोमय्या यांच्या उद्योगात वापरण्यात आला होता, असा दावा राऊत यांनी केला होता. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे सोमय्या आणि त्यांच्या चिरंजीवाने जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती.

संबंधित बातम्या:

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, INS Vikrant प्रकरणात अडचणी वाढल्या

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच, पोलीस कोठडीतील मुक्काम दोन दिवसाने वाढला

Gunratna Sadavarte : 1 कोटी 80 लाख रुपये कुठे गेले? सदावर्तेंनी एवढा पैसा का गोळा केला? कोर्टात घमासान

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.