Corona Udpates : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त

राज्यात आज (6 जून) कोरोनाच्या 2 हजार 739 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 82 हजार 968 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

Corona Udpates : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यात आज (6 जून) कोरोनाच्या 2 हजार 739 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 82 हजार 968 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). यापैकी आतापर्यंत 37 हजार 390 कोरोना रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 42 हजार 600 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 2 हजार 234 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

राज्यात 47 शासकीय आणि 38 खासगी अशा एकूण 85 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 37 हजार 124 नमुन्यांपैकी 82 हजार 968 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 46 हजार 566 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या महाराष्ट्रात संस्थात्मक क्वारंटाईनसाठी 75 हजार 741 खाटा उपलब्ध आहेत. यामध्ये सध्या 29 हजार 98 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय ठाण्यात 90 मृत्यू (मुंबई 58, ठाणे 10, उल्हासनगर 6, वसई विरार 1, भिवंडी 3, मीरा-भाईंदर 5, पालघर 1), नाशिक – 7 (नाशिक 5, मालेगाव 2), पुणे- 17 (पुणे 10, सातारा 5, सोलापूर 2), औरंगाबाद – 2 (औरंगाबाद मनपा 2), अकोला – 4 (अकोला मनपा 2, अमरावती 2) मृत्यू झाले. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 78 पुरुष, तर 42 महिला आहेत. या 120 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 53 रुग्ण आहेत, तर 47 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 20 जण 40 वर्षांखालील आहेत. या 120 रुग्णांपैकी 69 जणांमध्ये ( 57.5 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2 हजार 969 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 30 मृत्यू हे मागील 2 दिवसांतील आहेत, तर उर्वरित मृत्यू 3 मे ते 3 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 90 मृत्यूंपैकी मुंबई 53, मीरा भाईंदर – 5, भिवंडी – 3, ठाणे – 9, उल्हासनगर – 6 ,नवी मुंबई – 6, सातारा – 2, वसई विरार – 1, अमरावती – 1, औरंगाबाद – 1, मालेगाव – 1, नाशिक – 1, सोलापूर 1 असे मृत्यू आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3 हजार 603 झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 18 हजार 422 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 69.82 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई95100666335405
पुणे (शहर+ग्रामीण)42092172021152
ठाणे (शहर+ग्रामीण)65324295481769
पालघर 102265223202
रायगड91104222167
रत्नागिरी91662432
सिंधुदुर्ग2622205
सातारा1855107169
सांगली64838519
नाशिक (शहर +ग्रामीण)76634435306
अहमदनगर (शहर+ग्रामीण)98056426
धुळे161086478
जळगाव 63553661361
नंदूरबार 28216711
सोलापूर44782233357
कोल्हापूर 132283120
औरंगाबाद86594489345
जालना108458047
हिंगोली 3442862
परभणी2271197
लातूर 75835037
उस्मानाबाद 41025117
बीड2411245
नांदेड 63925427
अकोला 1900154795
अमरावती 91664737
यवतमाळ 46929814
बुलडाणा 42021617
वाशिम 2531105
नागपूर2156140423
वर्धा 44141
भंडारा175902
गोंदिया 2171623
चंद्रपूर1841020
गडचिरोली136711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)210031
एकूण2,67,6651,49,00710,695

संबंधित बातम्या :

कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अजित पवारांचे आदेश

खरंच दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात….

उद्धव काकांचं ऐकणार की नाही? आईचा चिमुकलीला दम, तर शिवसैनिकांना का त्रास देताय? मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन

Remdesivir Injection | कोरोनावर प्रभावी Remdesivir इंजेक्शन राज्य सरकार खरेदी करणार, काय आहे रेमडेसीवीर इंजेक्शन?

Total Corona Patient in Maharashtra Latest Updates

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *