VIDEO | कोण असली कोण नकली, यवतमाळमध्ये तृतीयपंथीयांत राडा
तृतीयपंथीयांचा एक गट आधीपासूनच बाजारात पैसे मागत असल्याचे पाहून दुसऱ्या गटाने वाद घालायला सुरुवात केली.

यवतमाळ : खऱ्या आणि खोट्याच्या मुद्द्यावरुन यवतमाळमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. भररस्त्यात तृतीयपंथी अर्धनग्न झाल्याने पादचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. दीड तास चाललेल्या या राड्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. (Transgender Ruckus in Yawatmal Market)
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी बाजारपेठेत तृतीयपंथीयांचे दोन गट एकमेकांना भिडले. आर्णीवासियांसाठी सोमवार हा बाजाराचा दिवस असतो. आजूबाजूच्या 35 ते 40 गावातील नागरिक बाजारासाठी आर्णीमध्ये येतात. बाजाराचा दिवस असल्यामुळे तृतीयपंथीही या ठिकाणी पैसे मागण्यासाठी मोठी गर्दी करतात.
असली-नकलीचा वाद उसळला
यवतमाळहून काही तृतीयपंथी आर्णी बाजारपेठेत गेले होते. त्या ठिकाणी आधीच तृतीयपंथीयांचा एक गट रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांकडे पैसे मागत फिरत होता. हे पाहून चक्रावलेल्या गटाने दुसऱ्या गटाशी वाद घालायला सुरुवात केली.
खरे कोण आणि खोटे कोण या मुद्द्यावरुन दोन्ही गटात मोठा वाद झाला, वादाचं पर्यवसन हाणामारीतही झालं. भररस्त्यात हा प्रकार जवळपास दीड तास सुरु होता. कहर म्हणजे त्यापैकी काही जणांनी रस्त्यातच अंगावरील कपडे उतरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांमध्ये तारांबळ उडाली.
तृतीयपंथीयाची नदीत उडी
वादावादीतून एका तृतीयपंथीयाने शहरातून वाहणाऱ्या अरुनावती नदीत 30 फूट खोल उडी घेतली. यामध्ये त्याला दुखापतही झाली. एकंदरीत या प्रकारामुळे बाजारपेठ खोळंबली आणि रहिवाशांनाही संकोच निर्माण झाला.
संबंधित बातम्या :
अनैतिक संबंधातून सुटका करुन घेण्यासाठी मित्रानेच केली तृतीयपंथी युवकाची हत्या
(Transgender Ruckus in Yawatmal Market)
