कुणबी प्रमाणपत्र कसं? टीव्ही9च्या हाती ओरिजनल प्रत; नाव, गाव आणि… काय काय आहे त्यात..
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्यानिमित्त साधून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी उपोषण केले. शेवटी पाचव्या दिवशी सरकारने जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करत थेट जीआर काढला. यामुळे हैद्राबादचे गॅझेटही लागू झाले. सरकारने काढलेल्या या जीआरचा ओबीसी नेत्यांनी विरोध केला. जरांगे यांनी दावा केला की, सरकारने काढलेल्या जीआरनंतर मराठवाड्यातील सर्व मराठा आता ओबीसीमध्ये गेलाय. मागील काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते सतत उपोषण करताना दिसले. शेवटी सरकारला मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यात त्यांनी भाग पाडले. हेच नाही तर कुणबी प्रमाणपत्र वाटपही सुरू करण्यात आलंय.
आता हैद्राबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यास सुरूवात झालीये. बीडमध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलंय. सरकारने काढलेल्या जीआरनंतर फक्त बीडच नाही तर अजून काही जिल्हांमध्ये प्रमाणपत्र वाटपाचे काम सध्या सुरू आहे.
हैदराबाद गॅजेटच्या आधारे ही प्रमाणपत्र दिल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले, अशी मागणी मागील काही वर्षांपासून होती. शेवटी मोठ्या लढ्यानंतर त्यांची ही मागणी पूर्ण झाली असून प्रमाणपत्र वाटप सुरू झालंय. आता बीडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेले कुणबीचे प्रमाणपत्र पुढे आलंय. दररोज अशी प्रमाणपत्रे वाटप केली जाणार आहेत.

Kunbi Certificate
दुसरीकडे सरकारच्या जीआरविरोधात ओबीसी नेते एकवटतांना दिसत आहेत. हेच नाही तर काल मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात महत्वाची बैठक पार पडली. सरकारने काढलेल्या जीआरच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचे अगोदरच ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केले. जीआर काढण्यापूर्वी आपल्याला कल्पना देण्यात आली नसल्याचे भुजबळांनी म्हटले. आता बंजारा समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, याकरिता बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरताना दिसत आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरूवात झाल्याने हा जरांगे पाटलांचा मोठा विजय म्हणावा लागेल.
