AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 4 May 2025 : एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशावर हल्ला

| Edited By: | Updated on: May 05, 2025 | 8:10 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 4 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 4 May 2025 : एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशावर हल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. सायंकाळी सात वाजता अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑल इंडिया फेडरेशन कप २०२५ कबड्डी स्पर्धेच्या समारोपाला ते हजेरी लावणार आहेत. प्रो-कबड्डीच्या धर्तीवर अमरावतीत प्रथमच होत असलेल्या या तीन दिवसीय स्पर्धेत देशभरातील नऊ राज्यांमधील पुरुष आणि महिला कबड्डी संघ सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या 7 तारखेला सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण पहिल्यांदाच न्यायालयाच्या यादीत आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याशिवाय देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेटस वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 May 2025 08:48 PM (IST)

    अहिल्यानगर -पुणे रोडवर एसटी बसला भीषण आग

    अहिल्यानगर -पुणे रोडवर एसटी बसला भीषण आग

    पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसला भीषण आग

    आगीत बस जळून खाक

    सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही

    आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट

    चालक्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

  • 04 May 2025 08:11 PM (IST)

    डोंबिवलीत दोन गटात तुफान हाणामारी

    डोंबिवलीत दोन गटात हाणामारी

    भाजप माजी नगरसेवकाच्या आजी माजी समर्थकांमध्ये राडा

    तलवारी-रॉडसह हाणामारी पाच जण जखमी

    विष्णुनगर पोलीसानी परस्परविरोधी गुन्हे दाखल करत तिघांना ठोकल्या बेड्या

    विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादातून जुन्या रागातून राडा झाल्याची माहिती

  • 04 May 2025 03:31 PM (IST)

    एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशावर हल्ला

    मुंबईहून सुटलेल्या अवन्तिका एक्सप्रेसमध्ये एका महिला प्रवाशावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पालघर लोकमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

  • 04 May 2025 02:47 PM (IST)

    पीओकेमध्ये थेटआणी-बाणी परिस्थिती; नागरिकांना 2 महिन्यांचा किराणा भरून ठेवण्यास सांगितले

    पीओकेमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे तेथील नागरिकांना 2 महिन्यांचा किराणा भरून ठेवण्यास सांगण्यात आलं आहेॉ.पीओकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पीओकेतील पर्यटन बंद करण्यात आलं आहे. पंतप्रधान चौधरी चिंतेत असल्याचं दिसून येत आहे. एवढंच नाही तर पीओकेमधील हॉटेल्सही पाक सैन्यानं ताब्यात घेतली आहेत. गुलमर्ग परिसरात BSF जवान तैनात करण्यात आले आहेत.

  • 04 May 2025 02:16 PM (IST)

    नाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या खांबांवर चित्रांच्या रुपानं श्रीराम जीवनगाथा सांगण्याचा प्रयत्न

    नाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या खांबांवर चित्रांच्या रुपानं श्रीराम जीवनगाथा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलाच्या खांबांवर साकारण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना चित्रांच्या माध्यमातून श्रीरामाच्या जीवनगाथेचे दर्शन घडणार आहे. द्वारका सर्कल ते मुंबई नाका सर्कल दरम्यान येणाऱ्या पिलर वर चित्रांच्या माध्यमातून श्रीराम जीवनगाथा साकारण्यात येत आहे.

  • 04 May 2025 01:54 PM (IST)

    नांदेड- धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

    नांदेड- धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू झाला. अजंता एक्सप्रेसमधून पडून 35 वर्षीय विजय ढिलोड यांचा मृत्यू झाला. नांदेडच्या धर्माबाद ते करखेलीदरम्यान चिकना शिवारातील ही घटना आहे.

  • 04 May 2025 01:47 PM (IST)

    पाण्याच्या टँकरसाठी सोलापूरकर मोजतात दरमहा 6 कोटी रुपये

    पाण्याच्या टँकरसाठी सोलापूरकर दरमहा 6 कोटी रुपये मोजतात. पाण्याची नासाडी करणाऱ्यांना महापालिकेकडून 200 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. उन्हाच्या तीव्रतेमुळे सोलापूर शहरावरही पाण्याचं संकट पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची मागणी 30 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आलीय. सोलापुरात दरमहा 16 हजार टँकर पाण्याची मागणी होत आहे

  • 04 May 2025 01:37 PM (IST)

    पुरंदर विमानतळ विरोधादरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 300 ते 400 शेतकरी आंदोलकांवर गुन्हा दाखल

    पुरंदर विमानतळ विरोधादरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 300 ते 400 शेतकरी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चार शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना सासवड कोर्टात हजर करण्यात आलंय.

  • 04 May 2025 01:27 PM (IST)

    मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात

    मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 04 May 2025 01:17 PM (IST)

    बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

    बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माहिती दिली. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

  • 04 May 2025 01:10 PM (IST)

    आमच्या खात्यातला निधीला कट मारून तो इतरत्र वळवण्यात आला- संजय शिरसाट

    “आमच्या खात्यातला निधीला कट मारून तो इतरत्र वळवण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही नेमकं काय काम करतोय हे जनतेला कळणार कसं? सरकारला कळणार कसं? मला वाटतं की समाज कल्याण विभाग हे गोरगरीब जनतेला न्याय देणारं विभाग आहे,” असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 04 May 2025 12:54 PM (IST)

    Maharashtra Breaking: नाशिकच्या मराठा हायस्कूल येथील नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करण्यास विलंब

    बायोमेट्रिक साठी तांत्रिक अडचणीत येत असल्याची माहिती… परीक्षा केंद्रावर तासाभरापासून विद्यार्थी रांगेत उभे, विद्यार्थी सम्रभित… बायोमेट्रिक तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दिला जाणार प्रवेश… बायोमेट्रिकचे सर्वर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना येताय अडचणी… बायोमेट्रिक न झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून राहावे लागेल वंचित , विद्यार्थ्यांमध्ये घबराट

  • 04 May 2025 12:45 PM (IST)

    Maharashtra Breaking: नांदेडची जीवन वाहिनी गोदावरी नदी जलपर्णीच्या विळख्यात

    शहरातील घाण पाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात… पर्यावरण प्रेमींची महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी… गोदावरी नदी स्वच्छतेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉक्टर किरण शिल्लेवार यांचं निवेदन…

  • 04 May 2025 12:37 PM (IST)

    Maharashtra Breaking: कार आणि क्रुझरचा नांदेडच्या अर्धापूर – तामसा रस्त्यावरील पाटनूर घाटात अपघात

    अपघात दोन जर गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी… गंभीर जखमींना तातडीने नांदेड येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवले… गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती

  • 04 May 2025 12:21 PM (IST)

    Maharashtra Breaking: रत्नागिरीत एकाच दिवशी दोन बिबट्यांचा मृत्यू

    रत्नागिरीत एकाच दिवशी दोन बिबट्यांचा मृत्यू… राजापूरमध्ये फसकीत अडकून बिबट्याचा मृत्यू… संगमेश्वरमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…

  • 04 May 2025 11:59 AM (IST)

    मग देवकर आता ओके झाले काय?

    ज्या अजित दादांवर नेहमी टीका केल्या, अजित दादांना काळे…झेंडे दाखविले…त्याच गुलाबराव देवकरांना अजित दादांनी त्यांच्या पक्षात घेतले आहे. गुलाबराव देवकर जे आम्हाला गद्दार म्हणत होते, खोके म्हणत म्हणत होते..ते मग काय आता ओके झाले काय? असा सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

  • 04 May 2025 11:50 AM (IST)

    राऊतांना मोदी समजायला वेळ लागेल

    संजय राऊत यांना मी आधीच सांगितलं आहे त्यांना टीका टिपणी करण्या व्यतिरिक्त दुसरी भाषा येत नाही. संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत पंतप्रधान मोदीजींनी समजायला संजय राऊत यांना वेळ लागेल, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

  • 04 May 2025 11:40 AM (IST)

    सद्भावना यात्रा परभणीमध्ये

    पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसच्या वतीने आज परभणी येथे सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गढूळ राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी सद्भावना यात्रा आयोजित केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

  • 04 May 2025 11:30 AM (IST)

    पुरंदर विमानतळप्रकरणात 300 ते 400 लोकांवर गुन्हा दाखल

    पुरंदर विमानतळ विरोध प्रकरणात आतापर्यंत 300 ते 400 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकिय कामकाजात अडथळा आणणे, किरकोळ जखमी करणे,जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अश्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामधील 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 04 May 2025 11:23 AM (IST)

    पुरंदर विमानतळासंदर्भात मुख्यमंत्र्यसोबत बैठक घेऊ

    पुरंदर विमानतळासंदर्भात मुख्यमंत्र्यसोबत बैठक घेऊ असे वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. भू संपादन मंत्री म्हणून मी स्वतः चर्चा करेन असे ते म्हणाले.

  • 04 May 2025 11:12 AM (IST)

    काँग्रेस नेत्यांना भाजपा छळत आहे-हर्षवर्धन सपकाळ

    भक्त प्रल्हाद यांची जशी परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर नृसिंह अवतारले, ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. काँग्रेस नेत्यांना भाजप जसे छळत आहे नरसिंह भाजपमध्ये राक्षसाला संपवण्यासाठी अवतार घेईल, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

  • 04 May 2025 11:00 AM (IST)

    दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

    राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.येत्या १५ मेपर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • 04 May 2025 10:58 AM (IST)

    शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

    पुण्यातील पुरंदर विमानतळ विरोध प्रकरणात 250 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी पुरंदर विमानतळास विरोध करणारे शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. यावेळी दगडफेकही करण्यात आली होती.

  • 04 May 2025 10:47 AM (IST)

    लाडकी बहीण योजना राज्याची, सर्व विभागाचा निधी घेतला तर…

    लाडक्या बहिणी आदिवासी भागात आहे. सामाजिक न्याय विभागात ज्या जाती आहेत, त्यांच्यात लाडकी बहिणी आहेत. यामुळे काही निधी आदिवासी विभागाचा, काही निधी सामाजिक न्याय विभागाचा, काही निधी महिला आणि बाल कल्याण विभागाचा असा थोडा थोडा निधी घेतला असेल तर काही हरकत नाही, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

  • 04 May 2025 10:28 AM (IST)

    पपईचा ट्रक उलटला, चालक गंभीर

    जळगावच्या पाळधीजवळ राष्ट्रीय महामार्गावर पपईने भरलेला ट्रक उलटला. यामुळे ट्रकमधील हजारो रूपयांच्या पपईचा माल रस्त्यावर पडला. या अपघातात चालक गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी जळगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 04 May 2025 10:10 AM (IST)

    अमृत योजनेच्या कामाची मंत्र्यांकडून पाहणी

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या जोगळखेडा गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या काठावर अमृत योजनेच्या माध्यमातून जॅकवेलचे काम सुरू असून या जॅकवेल मधून भुसावळ शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे दरम्यान वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या कामाची पाहणी केली.

  • 04 May 2025 09:15 AM (IST)

    शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी सुनावणी

    शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखवाल केली आहे. फेब्रुरी २०२३ मध्ये दाखल केलेली ही याचिका सप्टेंबर २०२३ नंतर पहिल्यांदाच सुनावणीसाठी न्यायालयासमोर येत आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दीड वर्षानंतर लागलेल्या या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 04 May 2025 09:13 AM (IST)

    पुणे पोलीस अलर्ट मोडवर, हॉटेल, लॉज आणि भाड्याने दिलेल्या घरांवर विशेष लक्ष

    पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस शहरात अलर्ट मोडवर आले आहेत. शहरातील हॉटेल, लॉज तसेच भाड्याने दिलेल्या घरांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणाऱ्या चार जणांविरुद्ध आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली असून, हॉटेल मालकांनी, लॉज चालकांनी आणि घरमालकांनी त्यांच्याकडील भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. यासोबतच, इस्टेट एजंट आणि प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणाऱ्यांनी देखील याबाबतची माहिती पोलिसांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • 04 May 2025 09:12 AM (IST)

    पुणे रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंग झोन, उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

    पुणे रेल्वे स्थानक परिसरात आता अधिकृत पार्किंग वगळता २०० मीटरच्या परिघात नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत जनजागृतीसाठी फलक लावण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर अवैध पार्किंगची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा जसे की रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस वाहने तसेच परीक्षांना येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीक अँड ड्रॉपची सुविधा नो पार्किंग झोनमध्ये उपलब्ध असेल.

  • 04 May 2025 09:10 AM (IST)

    ठाण्यातील माजीवाडा उड्डाणपूल २१ दिवस राहणार बंद

    ठाण्यातील माजीवाडा उड्डाणपुलावर आजपासून पावसाळ्यापूर्वी मास्टिंग टाकण्याचे काम २१ दिवसांसाठी हाती घेण्यात आले आहे. येत्या २२ मे पर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत भिवंडी, नाशिक किंवा मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक मंदावलेली असताना, आता उड्डाणपुलावरील वाहतूक खालून वळवल्याने वाहतूक कोंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहनचालकांना या वेळेत अन्य मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

Published On - May 04,2025 9:04 AM

Follow us
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...