AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं, योजनेबाबत मोठी अपडेट

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली असून, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं, योजनेबाबत मोठी अपडेट
लाडकी बहीण योजना Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 29, 2025 | 8:28 PM
Share

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.  या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये दर महिन्याला जमा करण्यात येतात. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. महिला वर्गामध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र अशा देखील काही महिला आहेत, ज्या या या योजनेसाठी पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांची नावं योजनेतून वगळण्यासाठी सरकारने आता या योजनेसाठी ई-केवायसी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे.

या योजनेसाठी सुरुवातीला केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती. मात्र अनेक लाभार्थी महिलांची ई केवायसी बाकी असल्यानं सरकारने के वायसीला मुदतवाढ दिली होती. सरकारकडून ई केवायसीला 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. आता ई केवायसी करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. मात्र समोर येत असल्येल्या माहितीनुसार यावेळी सरकार केवायसीची मुदत वाढून देण्याची शक्यता फारच कमी आहे.

दरम्यान या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक महिलांची केवायसी अजूनही बाकी आहे, आणि आता या योजनेसाठी केवायसी करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी वेळेत पूर्ण होणार नाही, त्यांना सन्मान निधी वितरण बंद होऊ शकते, तसेच सरकारकडून देखील या योजनेची केवायसीची मुदत वाढून मिळण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘लाडक्या बहिणींनो… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !’  असं ट्विट तटकरे यांनी केलं आहे.

शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.