
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीच्या बाबतीत जनभावना तीव्र आहेत आणि महादेवी परत येणारच,असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. तसंच माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ, त्याचा खर्चही कार्यकर्ते करतील, त्याचबरोबर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबतीत बैठक देखील होणार आहे, असं देखील मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची येत्या 6 ऑगस्टला भेट होणार आहे. “मनसेच्या बाळा नांदगावकरांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तेव्हा दोन ऑक्टोबरच्या मोर्चासंदर्भात शेतीच्या प्रश्नांवर भेटण्याचं बोलणं झालं होतं. आता योगायोगाने सहा तारखेला मी मुंबईत आहे, त्यामुळे राज ठाकरेंसोबत भेट होईल. राजकारण हा वेगळा विषय आहे आणि भेटीगाठी हा वेगळा विषय आहे”, असं बच्चू कडू म्हणाले. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
एकाची हत्या केल्याचा गुन्हा शिरावर असलेल्या एका 32 वर्षीय युवकाची दोघांनी धारदार कोयता आणि तलवारीने घाव घालीत हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या ग्राम वाघाडी येथे घडली आहे मया उर्फ महेश कोल्हेकर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे तर रोशन राऊत. उमेश शिरभाते असे मारेकरी दोघांची नावे आहेत मारेकरी आणि मृतक महेश यांच्यात जुन्या वाद होता त्यातूनच ही हत्या करण्यात आली आहे दरम्यान घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी अवगत तासाभरात दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे
भाजपचे प्रवक्ते पदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करू नये
सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती, ही नियुक्ती रद्द करावी
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार
यवतमाळमध्ये जुन्या वादातून 30 वर्षीय युवकाची कोयता आणि तलवारीचे घाव घालून हत्या करण्यात आली आहे. वाघाडी येथे ही घटना घडली आहे. मया उर्फ महेश कोल्हेकर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर रोशन राऊत आणि उमेश शिरभाते अशी आरोपींची नावे आहेत.
सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी परिसरात शुल्लक कारणावरून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणातील सहा आरोपींना 24 तासांच्या आत अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.
भारतीय सैन्य दलासाठी थेट जम्मू कश्मीर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर महारक्तदान शिबिर 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात सांगली जिल्ह्यातून तब्बल 1000 तरुण आपलं रक्तदान करणार आहेत.
माधुरी हत्तीन पुन्हा नांदणीला आणण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न प्रयत्न केले जातील, याबाबत लवकरचं अनंत अंबानीशी चर्चा केली जाईल अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड रोमुआल्डेझ मार्कोस ज्युनियर यांच्याशी प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, ‘भारतीय पर्यटकांना व्हिसा-मुक्त प्रवेश देण्याच्या फिलीपिन्सच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. भारताने फिलीपिन्सच्या पर्यटकांना मोफत ई-व्हिसा सुविधा देण्याचा निर्णयही घेतला आहे. या वर्षी दिल्ली आणि मनिला दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी काम केले जाईल.’
उत्तरकाशीतील ढगफुटीच्या घटनेबद्दल ब्रिगेड कमांडर ब्रिगेडियर मनदीप ढिल्लन म्हणाले की, आज दुपारी 1.45 वाजता धाराली गावात भूस्खलन आणि हिमस्खलन झाले. हर्षिल चौकीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीने सर्वप्रथम प्रतिसाद दिला आणि 10 मिनिटांत गावात पोहोचले. बचावकार्य सुरू आहे आणि आतापर्यंत 20 ग्रामस्थांना वाचवण्यात आले आहे.
माधुरी हत्तीन पुन्हा नांदणीला आणण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न प्रयत्न केले जातील,माधुरी हत्तीबाबत लवकरचं अनंत अंबानीशी चर्चा केली जाईल,अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. अनंत अंबानीशी संपर्क करण्याबाबतची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा जाऊन प्रयत्न करू. माधुरीला परत आणण्याची शिवसेना शिंदे गटाची भूमिका असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ते सांगलीमध्ये बोलत होते
जम्मू-कश्मीर मधील सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी एक हजार तरुण विशेष रेल्वेने रवाना झाले आहेत. मंत्री उदय सामंतांनी यावेळी झेंडा दाखवला.
मुंबईतील वरळी डोममध्ये आज 60-61 व्या महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या वेळी ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ हा ज्येष्ठ गायक भीमराव पंचाळ यांना प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ‘व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ‘व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ हा अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘राज कपूर जीवन गौरव पुरस्कार’ हा ज्येष्ठ अभिनेते अनुपम खैर यांना देण्यात येणार आहे. तर राज कपूर विशेष योगदान हा पुरस्कार काजोल यांना प्रदान करण्यात येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासात भारताचा टॅरीफ वाढवणार आहेत. भारत हा चांगला व्यापारी सहकारी नाही. तसेच रशियाकडून भारत अजूनही तेल खरेदी करतोय, असंही डोनाल्ट ट्रम्प म्हणाले.
मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रालयातील तळमजल्यावरील बाथरूमचे सिलिंग कोसळले आहे. सुदैवाने याच्यात कोणालाही दुखापत झाली नाही.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मराठी शिकवणं प्रत्येक शाळेसाठी कायद्याने अनिवार्य आहे. सरकारचा स्पष्ट अधिनियम असूनही अनेक नामांकित शाळा मराठी विषय शिकवायला टाळाटाळ करत आहेत, ही मराठी अस्मितेची थट्टा आहे. मराठीसाठी लढा हा केवळ भावनेचा नव्हे, हक्काचा आहे, असं अमित ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आगारातील चंद्रपूर-चिमूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला चारगावजवळ अपघात झाला आहे.या भीषण अपघातात बस वाहक सुरेश भटारकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील वापरत असलेल्या गाडीवर विधानसभा सदस्याचा लोगो असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
माजी खासदार इम्तियाज जलील आज मालेगाव दौऱ्यावर असून त्यांनी मालेगाव बॉबस्फोट पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच बॉम्बस्फोट झालेल्या भिक्कू चौकाची देखील पाहणी केली आहे.
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही असे धाराशिव येथे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह करण्यात आला असता मनोज जरांगे पाटील यांनी फेटा बांधण्यास नकार दिला. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार आहेत.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्ये अनिवार्य केले आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचा मीरा-भाईंदर महापालिकेचा उद्देश आहे. यासाठी, महापालिकेने शहरात तब्बल ३१ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींवर लाल रंगाचे मार्क केले जात आहेत. मूर्ती विक्रेत्यांनाही नोंदणी पुस्तिका (रजिस्टर) ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये आणि मूर्तिकारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, महापालिका पत्रके वाटून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगत आहे.
खेड तालुक्यातील खरपुडी येथे जावयाला मारहाण करून मुलीच्या अपहरणप्रकरणी आरोपी आई व दोन भावांना खेड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
इगतपुरी तालुक्यातील सुमारे ३०० शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या लेखा परीक्षणासाठी शिक्षकांकडून ३०० ते ४०० रुपये तसेच अधिकाऱ्यांना भोजनासाठी १०० रुपये मागितले जात असल्याचा गंभीर आरोप मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सपकाळे यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. तुमच्या नावाने बनावट खाते खोलून त्यात दहशतवादासाठी फंडिंग सुरू असल्याचे सांगत भीती दाखवली जात आहे. व्हिडीओ कॉल करून डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याची भीती दाखवण्यात आली. फसवणूक झालेल्या मध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. एका प्रकरणात 50 लाख, दुसऱ्या प्रकरणात 36 लाख तिसऱ्या प्रकरणात 33 लाख तर चौथ्या प्रकरणात 9 लाख रुपयांना घातला गंडा गेला.
भिवंडीत मेट्रोच्या कामामधील सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली आहे. अपघातात जखमी व्यक्तीस खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो मार्गावरील नारपोली धामणकर नाका परिसरात ही घटना घडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी माण आयटी नगरीमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेत सर्वच सरकारी यंत्रणांना कामाला लावलं असताना आयटी नगरी असलेल्या स्थानिकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंजवडीनंतर आता मान ग्रामस्थांनीही ग्रामसभा आयोजित करत गावठाणातील प्रस्तावित 36 मीटर रस्त्यांना विरोध केला आहे. जिल्हा परिषदेच्या विकास आराखड्याप्रमाणे गावठाणातील रस्ते 24 मीटर असावेत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. २५ जुलैपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. वातावरण उन्हाळ्यासारखे झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास आठ तालुक्यात भात, कापूस आणि मिरची पिकांची ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पावसाच्या अभावामुळे पेरणी केलेली पिके धोक्यात आली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 7 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान जिल्ह्यातील अनेकांचे पक्षात प्रवेश होणार आहेत. यामध्ये वडवणी येथील बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचा प्रमुख आणि महत्त्वाचा पक्षप्रवेश होत आहे. या पक्षप्रवेशाचे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात बॅनर लागले असून त्या बॅनरवर आमदार धनंजय मुंडे यांचा कुठेही फोटो लावण्यात आलेला नाही. तर आज आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले असून त्यावर आमदार प्रकाश सोळंके यांचा फोटो टाळण्यात आलाय. यामुळे जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची देखील जोरदार चर्चा होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. संगमनेर, शेवगाव आणि जामखेड या तीन तालुक्यातील ११ गावांना ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढलेल्या आदेशानुसार, या ११ गावांसह त्यांच्या ५ किलोमीटर परिसरातील क्षेत्र बाधित आणि १० किलोमीटर परिसरातील क्षेत्र नियंत्रित म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे बाधित क्षेत्रात जनावरांचे बाजार, प्रदर्शन आणि शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्ते याचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून त्याने समाज माध्यमांवर पोस्ट केला होता. एका बाजूला आदर्श आचारसंहितेचा भंग आणि मतदानाची गोपनीयता जपण्यासाठी सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल होतात, मात्र गोट्या गित्तेसाठी परळीमध्ये वेगळा नियम आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सव मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी पोलिसांकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यानुसार, ‘एक मंडळ एक ढोल पथक’ या धोरणाचे पालन करत मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर मंडळांना आपापल्या मार्गावरून जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच, गणेशोत्सवादरम्यान बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्याची मागणीही मंडळांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लीमविरोधी वक्तव्यविरोधात विरोधात नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक नांदेड जिल्हाध्यक्ष मकसूद पटेल लोहगावकर यांनी राजीनामा दिला. यवत येथील सभेवरून संग्राम जगताप यांच्या भाषणाची चौकशी करून कारवाई करावी. राजीनामा दिल्यानंतर मकसूद पटेल लोहगावकर यांनी मागणी केली.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1,700 रुपयांनी वाढ झाली असून सोने पुन्हा एक लाख पार गेले आहे. सोन्याच्या भावात वाढ होऊन सोन्याचे दर 1 लाख 200 रुपयांवर पोहोचले. चांदीच्याही भावात 1 हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर 1 लाख 13 हजार रुपयांवर पोहोचले आहे मात्र अमेरिकेन टॅरिफचे सावट असल्याने सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठाणे,कल्याण डोंबिवली मधील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका याशिवाय एम एम आर क्षेत्रातील महापालिकांच्या आढावा उद्धव ठाकरे बैठकीत घेणार आहेत शिवसेना पक्ष फुटी नंतर शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे कल्याण डोंबिवली या भागात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यासाठी आज ही बैठक होत आहे.या बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन देखील करणार आहेत शिवसेना पक्षातून होणारे आउटगोइंग थांबवण्याच्या दृष्टीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न केला जाणार आहे साडेबारा वाजता उद्धव ठाकरेंसोबत ही बैठक होणार आहे
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी मानहानीची याचिका दाखल केली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. 15 दिवसांपूर्वी त्यांना नोटीस दिली होती. मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता.
पुण्यातील गणेश मंडळांची बैठक सुरू झाली आहे.ज्या मंडळांची हरकत आहे त्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. दुपारी १ वाजता मुख्य म्हणजेच मनाचे पाच गणपती मंडळ आणि इतर सहभागी होणार आहे. नंतर सगळ्यांची एकत्रित बैठक देखील होणार. पुणे पोलीस आयुक्तांसह, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सगळ्या परिमंडळांचे उपायुक्त देखील उपस्थित आहेत.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला न बोलावल्याने खासदार शाहु महाराज नाराज झाल्याचे समजते. त्यांना या बैठकीला बोलावले नसल्याचे समोर येत आहे.
राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे. माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आणि सरकारही बाजू मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले.
महादेवी हत्तीण परत आली पाहीजे ही सर्वांची इच्छा, मठाने याचिका दाखल करावी , सोबत सरकारही याचिका दाखल करणार – मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस
महादेवी हत्तीणसंद्रभात मंत्रालयात बैठक, मुख्यमंत्र्यांनी जनभावना समजून घेतल्या, सरकार प्रयत्नशील – अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच आमचे बाप, आम्ही बाप बदलत नाही. आमचा बाप काढण्याची कोणाला गरज नाही, परिणय फुकेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे.
मी शेतकरी पुत्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहीत आहेत. त्यामुळे भविष्यात निश्चितपणे या विभागाच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मदत, सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न असेल.
शिंदेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे अनेक मंत्री फक्त नावापुरते आहेत, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे. त्यांच्या खात्याचे अधिकार मुख्यमंत्रीच घेतात, प्रत्येक निर्णयात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असतो असेही वैभव नाईक म्हणाले.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात १,७०० रुपयांनी वाढ झाली असून सोने पुन्हा एक लाख पार गेले आहे. सोन्याच्या भावात १ हजार ७०० रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर १ लाख २०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्याही भावात १ हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर १ लाख १३ हजार रुपयांवर पोहोचले आहे… मात्र अमेरिकेन टॅरिफचे सावट असल्याने सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
प्रलंबित खटल्याची आणि पायाभूत सुविधांची आकडेवारी समोर ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी… पुण्यातील महाविद्यालय वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची आवश्यकता असल्याचं पत्राद्वारे केले निवेदन… गेल्या अनेक वर्षापासून उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा बेंच पुण्यात व्हावा अशी मागणी होती एडवोकेट बार कौन्सिल कडून वारंवार होत आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रश्ना संदर्भात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे
पुण्यातील एका ही थियटरमध्ये चित्रपट दाखवला जाणार नाही… पुण्यातील थिएटर चालक , मालक संघटनांनी घेतला निर्णय.
जळगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना निलंबित करण्यात आले आहे… सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन व जन्म – मृत्यू विभागात पत्नीच्या जागी पतीला कामावर घेणे या दोन प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे… महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निलंबन आदेश काढले असून आता डॉ. घोलप यांची आस्थापना विभागाकडून चौकशी केली जाणार आहे
दिल्लीत NDA च्या बैठकीला सुरूवात झाली आहे.
अजित दादा सीएम होणार असतील तर आम्हाला दु:ख नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रवक्ते आणि कळवा मुंब्रा मतदार संघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा बॅनर ठाण्यामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आलेला आहे
पुणे- पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडीसाठी होणाऱ्या रिंग रोडसाठी निधी द्या, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 12,220 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रिंग रोडच्या कामाचा आढावा घेतला त्यानंतर या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
धाराशिव- माजी आमदार राहुल मोटे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 3 वाजता मुंबई इथल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राहुल मोटे प्रवेश करणार आहेत.
पुणे- उड्डाण पुलाच्या कामामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता ते स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना इनामदार चौकातून विश्रांती नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे. विश्रांती नगरकडे जाणाऱ्या वाहनाने स्वारगेटच्या दिशेने जाऊन राजारामपुरी चौकात यू टर्न घेऊन इच्छिते स्थळी जावं, असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.
नाशिक- जयभवानी रोडवरील लोणकर मळा इथं पहाटे बिबट्याचं दर्शन झालं. सीसीटीव्हीमध्ये बिबट्या फिरताना कैद झाला. स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याची दहशत आहे. तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.
पुणे -महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना नगर विकासला सादर करण्यात आल. नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार 42 प्रभागाची निर्मिती करण्यात आली. 2017 नुसारच प्रभागाची रचना करण्यात आल्याची माहिती आहे. समाविष्ट गावामुळे महापालिकेची हद्द वाढल्याने चार लाख मतदारांची भर पडली आहे.
धाराशिवच्या चोराखळी इथल्या कालिका कला केंद्रावर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. जुन्या वादातून दोन जणांवर तलवार, कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. संदीप गुट्टे आणि रोहित जाधव या दोघांना मारहाण करण्यात आली. जखमींवर धाराशिवमधील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातुन संदीप गुट्टे आणि रोहित जाधव यांच्यावर २५ ते ३० जणांच्या जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.