
मुसळधार पावसाने मुंबईसह ठाणे, पालघरला झोडपून काढलंय. आज (सोमवार) मुंबईसह ठाणे, पालघर भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनांनी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. तसंच येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान अनेक जिल्ह्यांना रविवारी अतिमुसळधार पावसाने झोडपलं. यादरम्यान विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. अहिल्यानगरमधील शिर्डी-राहाता शिवाराजवळ ओढ्यावरून जाताना दोन दुचाकीवरील चौघे पाण्यात वाहून गेले. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
जळगावात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकाला होता, या प्रकरणात आता शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह 7 जणांना जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने गाठली नवी विक्रमी उच्चांकी
सोन्या दरात प्रति तोळ्यामागे एक हजारांची वाढ तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे एक हजाराची वाढ
सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 19 हजार 300 रुपयांवर पोहोचले
तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 400 रुपयांवर
मंत्री दादा भुसे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीला सुरुवात
जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारीही बैठकीला उपस्थित
जळगावच्या पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा
हिवरा नदीकाठावरील घर कोसळले, एका लहान बालकाचा मृत्यू
एक जण गंभीर जखमी, जखमीला रुग्णालयात हलवले
घटनेची माहिती मिळतात प्रशासनाने घटनास्थळी घेतली धाव
अहिल्यानगरमध्ये पोलीस प्रशासनाकडून रुट मार्च काढण्यात आला आहे. धार्मिक तणावानंतर पोलिसांकडून हा रुट मार्च काढण्यात आला.
जळगावच्या पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या अतिवृष्टीत हिवरा नदीकाठावरील घर कोसळले. घर कोसळल्याने एका लहान बालकाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे. या जखमीला रुग्णालयात हलवले आहे. घर कोसळल्याचं कळताच स्थानिकांनी धाव घेत ढिगाराखाली दबलेल्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात चिमुरड्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने नवी विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावात सोन्या आणि चांदीच्या दरात प्रत्येकी 1 हजार रुपयांची वाढ झाली. यासह सोन्या आणि चांदीच्या दराने नवा इतिहास रचला आहे.
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 19 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार,400 रुपयांवर पोहचले आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने 1 लाख 19 हजार तर चांदीच्या दराने दीड लाखांचा आकडा पार केला आहे. अवघ्या काही दिवसांवर दसरा असून दसऱ्याचे मुहूर्तावर सोना खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
मंत्री दादा भुसे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. मंत्री दादा भुसे नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत आहेत. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी उपस्थित आहेत.
भारत-भूतान रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, ज्याचा खर्च 4000 कोटी असेल. भारत-भूतान रेल्वे प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होईल.
पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील नवीन भाजप कार्यालयाचे उद्घाटन केले. दिल्लीतील नवीन भाजप कार्यालय दीनदयाळ उपाध्याय मार्गावर आहे.
मीरा-भाईंदरमध्ये आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नवघर रोड येथे महाराष्ट्रातील पहिल्या पाळीव प्राणी शवदाहिनी, पारंपरिक मानव शवदाहिनी आणि गॅसवर चालणाऱ्या आधुनिक मानवी शवदाहिनीचं लोकार्पण करण्यात आलं.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ‘जिवे मारण्याची धमकी’ दिल्याबद्दल भाजप नेते प्रिंटू महादेवन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीने रौद्र रूप धारण केल्याने चांदसर गावात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. कर्ज काढून पिके घेतली. मात्र पिके तर सोडाच शेतजमीन सुद्धा शिल्लक राहिली नाही अशी प्रतिक्रिया महिला शेतकऱ्यांनी दिली आहे. शेत जमीनच वाहून गेल्याने उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.
करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यामुळे बिटरगावला तिसरा पुराचा फटका बसला आहे. प्रत्येक महापुरात पाणी वाढत होत, पाणी कुठपर्यंत येईल माहिती नव्हती मात्र प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली. कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.
राज्यात मुसळधार पावसामुळए पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी मोठी घोषणा करत 10 कोटींची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही मदत देण्यात येणार आहे.
भंडारा : रात्रीच्या सुमारास गावातील पटांगणावर कब्बड्डी ची प्रॅक्टिस करीत असताना तिथं अंधार असल्यामुळे लाईट लावायला गेला असता युवकाला जोरात करंट लागल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील लाखोरी गावात घडली आहे. त्या युवकाला लाखनी ग्रामीण रुग्णालयात भरती कारण्यात आले असून डॉक्टरांनी मृत्य घोषित केले आहे. मृतकाचे नाव हरिकृष्ण भदाडे असून याची माहिती गावात पोहचताच ग्रामीण रुग्णालयात त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती.
सातारा : खटाव तालुक्यात मागील चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात ओढ्याना पूर आला आहे. परिसरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. सोयाबीन, कांदा, घेवडा, टोमॅटो अशा विविध पिकाचे नुकसान झाल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहायला मिळतेय. प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले असून याची लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
दसरा मेळावा आधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटाची ‘विचार-रक्त’ बॅनरबाजी चर्चेत आहे.
मनसेच्या निषेधानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांनी अंधेरी मेट्रो स्टेशनवरील काळे केलेले बोर्ड काढले.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात सेंचुरीयन बिझनेस पार्कला आग लागली आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ऑफिसमध्ये आग लागल्याचे समोर आले आहे.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणीत धनगर समाज बांधवांकडून परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या घरी ढोल बजाव आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार राहुल पाटील यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पर्यंत करणार आल्याचे सांगितले.
जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी 5 वाजता बैठक पार पडणार. मागील 11 दिवसांपासून धनगर आरक्षण प्रश्नी दिपक बोराडे यांच आमरण उपोषण सुरू आहे. नुकतीच सरकारच्या शिष्टमंडळाने देखील आंदोलनस्थळी भेट दिली होती मात्र तरीदेखील दिपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू ठेवलं होतं.
अहिल्यानगरच्या कोटला गावात तणाव प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने एकाला ताब्यात घेतलं आहे. रास्ता रोको सुरु झालेला. महामार्ग बंद केलेला. वाहनांच्या लांबच लांब रागा लागलेल्या.
अहिल्यानगरच्या कोटलामध्ये आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज. अहिल्यानगर-संभाजी नगर रोडवरील जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज. अहिल्यानगरच्या कोटलामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. अज्ञाताकडून मुस्लिम धर्मगुरुच नाव रोडवर लिहून विटंबना.
“शेतकऱ्यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोचवणे हा माझा गुन्हा आहे का?. मी काय दोन नंबर धंद्यासाठी, टेंडरच्या टक्केवारीसाठी फोन केला होता का?. लोकांचा आवाज बनणे हा जर गुन्हा असेल तर कुणी फासावर लटकवले तरी चालेल, मी लढत राहीन” असं प्रा डॉ ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे.
धाराशिव – परंडा तालुक्यातील उल्फा नदीच्या पुराने रुई गावातील केळी भुईसपाट झाली आहे. काढणीस आलेली केळी मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्याने आळजापूर येथील अनेक घरात पाणी शिरलं आहे. घरांचे खूप नुकसान झालंय, आता हा संसार कसा उभा करायचा असा सवाल लोकांच्या डोळ्यात आहे. अनेकांच्या शेताचे सुद्धा खूप मोठे नुकसान झाले आहे, सरकारने तातडीची मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सोलीपूरमध्ये शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं. तुमच्या पक्षाकडूनही मदत करा ना असं जिल्हाधिकारी म्हणाले. 3 हजार लोक असताना तुम्ही केवळ 200 कीट्स घेऊन आलात, असंही त्यांनी सुनावलं. नुसते 200 कीट्स नको, 3 हजार लोकांची व्यवस्था करा, असंही त्यांनी सांगितलं.
नाशिक शहरातील वाहतूक कोंडीत खुद्द नाशिकचे जिल्हाधिकारी अडकले . बेशिस्त पार्किंग आणि पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा जिल्हाधिकाऱ्यांना फटका बसला. नाशिक शहरात दररोज वेगवेगळ्या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीने नाशिककर त्रासले आहेत. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करणाऱ्या, प्रशासनाच्या प्रमुखालाच वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केज तालुक्यातील बंदेवाडी येथील शेतकरी जनार्धन जगताप यांची उभी असलेली टोमॅटोची बाग या पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. टोमॅटो बागेसह परिसरातील सोयाबीन, कांदा, उडीद, मूग आणि इतर खरीप पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याला बसलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे येथील शाळा गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत. सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीमध्ये एक लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पुरामुळे आवर पिंपरी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, परिसरातील दळणवळण विस्कळीत झाले आहे. तसेच, शिक्षकांना गावात येण्यासाठीचा रस्ता बंद असल्यामुळे प्रशासनाला नाईलाजाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. निदान आता त्यांना जगण्यापुरती तरी काहीतरी मिळावं. ५० हजार हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचे आहे. त्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवावी. तुम्ही कर्जमाफीची घोषणा नंतर करा, असा सल्ला संजय राऊत यांनी सरकारला दिला.
जालना जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे खरीप पिकांसह फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील माहेर भायगाव, वाकुळणी बाजार आणि वाहेगाव या भागांतील फळबागांना या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. आजही अनेक फळबागांमध्ये पाणी साचले आहे. बागांवर सुरुवातीपासून केलेला संपूर्ण खर्च पाण्यात गेल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे, सरकारने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी येथील संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या चांदसर गावातील शेतकरी गिरणा नदीच्या पुरामुळे संकटात सापडले आहेत. गिरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तिचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतांमध्ये शिरले आहे. यामुळे चांदसर गावाच्या परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, शेतात अक्षरशः नदीप्रमाणे पाण्याचे प्रवाह वाहत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या पुरामुळे शेतातील केळी, कापूस आणि मका यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पुराच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सारंगखेडा बॅरेजचे 5 दरवाजे आणि प्रकाशा बॅरेजचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडलेत. सारंगखेडा बॅरेजमधून 61.274 क्युसेक तर प्रकाशा बॅरेजमधून 62.468 क्यूसेक्स पाण्याच्या विसर्ग होत आहे.
कल्याण नगर मार्गावरील शहाड पूल अवजड वाहतुकीसाठी काल मध्य रात्रीपासून १५ ऑक्टोम्बर पर्यंत बंद. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देखभाल दुरुस्तीचे कामा साठी तब्बल 17 दिवसात बंद करण्याचा निर्णय
धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी अमरावतीत आज सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर घंटानांदोलन. धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानांद आंदोलन..
रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पावसाने थोडी उसंत घेतली आहे तरी आज मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. मुंबईला दिलेल्या यलो अलर्टमुळे मुंबई महापालिका सतर्क आहे.
गडचिरोलीत अवैधरित्या विक्रीकरिता साठवण करून ठेवलेल्या 14 लाख 50 हजार रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम बामणी पोलीस स्टेशनने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्पेशल टीमने ही कारवाई केली. यात एका आरोपीलाही अटक करण्यात आली.
प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील प्रवरा उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
अहिल्यानगरमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा एकदा महापूर आला आहे. उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावात पुन्हा एकदा पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. सीना नदीत सुमारे 1 लाख 54 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील अनेक गावात पुन्हा पाणी शिरलंय.
नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 17 दरवाजे दोन दिवसांपासून उघडलेलेच आहेत. गोदावरी नदीपात्रात 2 लाख 77 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. आठ दिवसांपासून गोदावरी नदीला पूर परिस्थिती कायम आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा आहे. 19 वर्षानंतर पहिल्यांदाच विष्णुपुरीचे 17 दरवाजे उघडले.
इगतपुरी शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. विपश्यना केंद्र, फणसवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. फणसवाडी, चांदवाडी, आवळखेड इत्यादी वाड्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे.
कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह या काल जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसेच मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्याने दक्ष राहण्याचे निर्देश दिले.
रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पावसाने थोडी उसंत घेतली आहे. तरी आज मुंबई, ठाणे पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. मुंबईला दिलेल्या यलो अलर्टमुळे मुंबई महापालिका सतर्क आहे. मुंबईत ठिकठिकाणी सक्शन पंप आधीच तैनात करून ठेवण्यात आले आहेत.