उदयनराजेंचं मातृप्रेम! आईचे पाय भाजू नये म्हणून स्वत: चप्पल दिली!

उदयनराजेंचं मातृप्रेम! आईचे पाय भाजू नये म्हणून स्वत: चप्पल दिली!

सातारा: आई ही अखेर आईच असते ती गरीबाच्या मुलांची असो किंवा सामान्य घरातील; किंवा असो ती राजे महाराजेंच्या घरातील.  मुलाच्या वेदना जशा आईला कळतात तशाच आईच्या वेदनाही मुलाला कळतातच आणि आपल्या आईला कसलाही त्रास होऊ नये, यासाठी हवे ते कयास करण्याची तयारी मुलाची असते. याचा प्रत्यय आला तो छत्रपती उदयनराजे यांच्या रुपाने.

छत्रपती कल्पनाराजे भोसले या उदयनराजेंच्या मातोश्री याही सध्या आपल्या मुलाच्या प्राचारत हिरीरीने भाग घेत आहेत. याचदरम्यान उदयनराजेंचा अर्ज भरण्याची रॅली निघाली होती. यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रॅली आल्यानंतर, आईसाहेब जेव्हा पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांचे पाय भाजतील हे उदयनराजेंच्या लगेच लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी ताबडतोब आपल्या मातोश्रींच्या चप्पल स्व:त उचलून त्यांना घालण्यासाठी दिल्या. या वेळचा हा मायेचा हा प्रसंग पाहून राजेंच्या मातृप्रेमाची चर्चा साताऱ्यात रंगली होती.

सातारा लोकसभा

सातारा लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान होत आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेनेत दाखल झालेले नरेंद्र पाटील यांच्यात लढत होत आहे. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याचा निकाल 23 मे रोजी लोकसभेच्या निकालावेळी समजेल

Published On - 11:38 am, Sat, 6 April 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI