AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीच्या आधी डोंबिवलीत मोठी राजकीय घडामोड घडणार, ठाकरे गट सक्रिय; कुणाच्या कुणासोबत गाठीभेटी?

संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या डोंबिवलीत भाजपाच्या नगरसेवकाने काल राजीनामा दिल्यानंतर मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यामुळे राजकारणाला आणखी गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीच्या आधी डोंबिवलीत मोठी राजकीय घडामोड घडणार, ठाकरे गट सक्रिय; कुणाच्या कुणासोबत गाठीभेटी?
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
| Updated on: Jun 27, 2025 | 5:16 PM
Share

शिवसेनेत फूट पडल्यानंतर डोंबिवली शहरातही मोठा उलटफेर झाला होता. ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याने या फूटीचा डोंबिवली शहरातही परिणाम झाला होता. डोंबिवली तसा भाजपाचा बाले किल्ला मानला जातो. येथे पूर्वीपासून संघाचे प्राबल्य राहिलेले आहे. आता डोंबिवली शहरात मोठी घडामोड घडली आहे. भाजपाच्या माजी नगरसेवकाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे माजी नगरसेवकाचा आता ठाकरे गटात प्रवेश होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राजीनामा प्रकरणात नवा ट्विस्ट

ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्याची पत्नी कविता म्हात्रे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.नुकताच भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय दृष्टया पाहिले जात आहे. विकास म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार? अशी चर्चा आता डोंबिवलीत रंगली आहे.

डोंबिवली भाजपमधील मोठा भूकंप घडवणाऱ्या माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी काल पक्षाला राजीनामा दिल्यानंतर आज आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी आज विकास म्हात्रे यांच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याने कविता मात्रे आणि विकास म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार? अशी चर्चा रंगली आहे.

या वेळी आज विकास म्हात्रे यांच्या आईचे वर्षश्राद्ध असल्याने सदिच्छा भेट म्हणून आपण त्यांच्या घरी गेलो होतो. राजकीय चर्चा झाली नाही. पण लवकरच चांगली बातमी मिळेल अशा आशयाचे विधान दीपेश म्हात्रे यांनी मीडियाशी बोलताना केले आहे. जेव्हा एखादा नगरसेवक तळमळीने कामासाठी पक्षाला साकडे घालत असतो आणि त्याला प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा त्याने निर्णय घेणं योग्यच आहे. विकास म्हात्रे आमचे नातेवाईक आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. योग्य मानसन्मान देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे. लवकरच उद्धव ठाकरे डोंबिवलीत येणार असुन मोठा जल्लोष होणार असल्याचे सुतोवाच दीपेश म्हात्रे यांनी केल्याने काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागले आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.