AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाऊदची रत्नागिरीतील हवेली 11 लाखांत विकली; दिल्लीतील दोन वकिलांनी सहा मालमत्ता घेतल्या

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा आज अखेर लिलाव सुरू झाला आहे.

दाऊदची रत्नागिरीतील हवेली 11 लाखांत विकली; दिल्लीतील दोन वकिलांनी सहा मालमत्ता घेतल्या
| Updated on: Nov 10, 2020 | 6:44 PM
Share

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा अखेर लिलाव झाला आहे. दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या आहेत. यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या आहेत.  तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे. सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव झाला (Dawood Ibrahim Konkan Property Auction).

नरिमन पॉईंट येथील सफेमा कार्यलयात दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीचा लिलाव झाला. एकूण 17 प्रॉपर्टीचा लिलाव यावेळी झाला. त्यापैकी 7 प्रॉपर्टी दाऊदच्या होत्या. तर एक प्रॉपर्टी इकबाल मिरचीची आहे.

दाऊदची मालमत्ता

1) सर्व्हे नंबर 151 वरील 27 गुंठे 2) सर्व्ह नंबर 152 वरील 29.30 गुंठे 3) सर्व्हे नंबर 152 वरील 24.90 गुंठे 4) सर्व्ह नंबर 150 वरील 20 गुंठे 5) सर्व्ह नंबर 155 वरील 18 गुंठे 6) सर्व्हे नंबर 181 वरील 27 गुंठे आणि हवेली

दाऊदच्या 4,5,7 आणि 8 क्रमांकाची मालमत्ता भूपेंद्र भारद्वाज यांनी विकत घेतल्या. तर 6 आणि 9 क्रमांकाची संपत्ती अजय श्रीवास्तव यांनी-घेतली. तर दाऊदच्या 10 क्रमांकाच्या प्रॉपर्टीला परत घेण्यात आलं आहे.

इकबाल मिरचीची प्रॉपर्टी यंदाही लिलावात गेली नाही. त्याची प्रॉपर्टी जुहू परिसरात आहे. लिलावात बोली लावणाऱ्यांच्या मते त्याच्या प्रॉपर्टीची किंमत जास्त लावण्यात आली आहे.

तीन पातळीवर लिलाव 

  • टेंडरद्वारे
  • ई-टेंडरद्वारे
  • ई-ऑक्शनद्वारे

लिलावात मुंबके गावातील (Mumbake Village Khed) स्थानिक शेतकरी सहभागी होणार नाहीत. स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नाहीत, अशी माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली.

ACTच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासूनच सर्व प्रॉपर्टी दाखवायला सुरुवात केली होती. मुंबईमधील दाऊदच्या जवळपास सर्व प्रॉप्रटींचा लिलाव केल्यानंतर आता त्याच्या रत्नागिरीतील जमीन आणि घराचाही लिलाव होणार आहे. ही सर्व प्रोपर्टी महाराष्ट्रच्या रत्नागिरी खेड जिल्ह्यात आहे.

सेफमाचे संबंधित अधिकारी सय्यद मुनाफच्या माहिती प्रमाणे, “दाऊदच्या एकूण 17 प्रॉपर्टी शिल्लक आहे. त्यातल्या 8 प्रॉपर्टीचा लिलाव आज होणार आहे. कोरोनामुळे फक्त ई-ऑक्शन आणि टेंडर मार्फत लिलाव होणार आहे.

दाऊदच्या मालमत्तेच्या रकमा निश्चित

इब्राहिम दाऊदचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके आहे. दाऊदचे बालपण या गावात गेले. पण आता मोस्टवाँटेड डॉन म्हणूनही दाऊदचं नाव जगजाहीर करण्यात आलं आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाच्या रकमा निश्चित केल्या आहेत. यात दाऊदच्या मूळ गाव असलेल्या मुंबके गावातील मालमत्तेची रक्कम 14 लाख 45 हजार रुपये, तर लोटे येथील आंब्याच्या बागेची किंमत 61 लाख 48 हजार निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, दाऊदची मालमत्ता खरेदीसाठी मुंबके गावातील गावकरीच सरसावले आहेत.

दाऊदच्या मुंबकेमधील मालमत्तेचा दोन वेळा लिलाव जाहीर झाला होता, परंतु खरेदीसाठी कोणीही पुढे आले नाही, आता तिसऱ्यांदा लिलाव होणार आहे.

मुंबके गावातील दाऊदची प्रॉपर्टी

मुंबके गावातील प्रॉपर्टी दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम फरार झाला. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला आहे. आता कोकणातील प्रॉपर्टीचा लिलाव केला जाणार आहे. कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित मालमत्ता दाऊदचे काका कसत आहेत. पण, आता लिलाव होत असेल तर सरकारच्या नियमांप्रमाणे व्हावे, अशी आशा दाऊदच्या काकांनी व्यक्त केली. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलाव हा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय असतोच. त्यामुळे दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीचा लिलाव कोण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Dawood Ibrahim Konkan Property Auction

संबंधित बातम्या :

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यासाठी लोकांची उत्सुकता, सफेमाकडून 17 संपत्तीचा लिलाव

दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी

दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.