AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राज्याचा मुख्यमंत्री बदला…” पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर कोणी केली मागणी?

पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली. पीडित तरुणी फलटणला जात होती. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे

राज्याचा मुख्यमंत्री बदला... पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर कोणी केली मागणी?
pune bus
| Updated on: Feb 26, 2025 | 10:56 PM
Share

पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. सोमवारी पहाटेच्या ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती, त्यावेळी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. या प्रकरणानंतर कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

पुण्यात झालेल्या या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचा मुख्यमंत्री बदला, अशी मोठी मागणीही यावेळी केली.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“पुण्यातील मध्यवर्ती स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेला अत्याचार ही अत्यंत गंभीर घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण, परिस्थिती तशीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून, देशात महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

पुण्यातील स्वारगेट सारख्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बस डेपोवर महिला सुरक्षित नाहीयेत तर महिला सुरक्षित आहेत कुठे? या अत्याचार प्रकरणात पोलीस कारवाईच्या आधीच उलटसुलट चर्चा करताय. महिलेला परत अपमानित करू नका. कधीही पीडितांना ब्लेम केले जात नाही. स्वारगेट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी”, असे प्रकाश आंबडेकरांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडल?

पुण्यातील स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर शिवशाही बसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली. सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या हा सर्व प्रकार उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायच असल्याच सांगितलं. त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असं सांगितलं. त्यावर तरुणीने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं”

“त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की, बस इथे लागत नाही, मी तम्हाला दाखवतो असं म्हणाला. त्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. “मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की, बसमध्ये तर अंधार आहे. त्यावर आरोपीने तिला सांगितलं की, ही रात्रीची लेट बस आहे. सगळे लोक झोपले आहेत, हवं तर तू वर चढून टॉर्च मारुन बघं. ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करुन घेतला आणि दुष्कृत्य केलं” अशी माहिती पोलिसांनी दिली.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...