Video : ऐकावं ते नवलंच… एकाच घरात जन्माला आले राष्ट्रपती आणि पंतप्रधान! नेमका प्रकार काय?

उस्मानाबादेत सध्या दोन नावांची चांगलीच चर्चा सुरु आहे आणि दुसरं म्हणजे एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान जन्माला आलेत! तुम्ही म्हणाल हा काय प्रकार? तर त्याचं झालं असं की, उस्मानाबाद जिल्ह्यातील चौधरी कुटुंबानं आपल्या मुलांची नावं थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेवली आहेत. ते ही पाळण्यात घालून, अगदी परंपरेनुसार!

Video : ऐकावं ते नवलंच... एकाच घरात जन्माला आले राष्ट्रपती आणि पंतप्रधान! नेमका प्रकार काय?
नामकरण सोहळा
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 8:05 PM

उस्मानाबाद : नावात काय आहे? या शेक्सपियरच्या विधानावर अनेक चर्चासत्र झडली असतील. अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी त्याचा किस पाडला असेल. मात्र, माणूस किंवा कुठलीही वस्तू नावानेच तर ओळखली जाते, असं सर्वसामान्य बोलून जातात. मात्र, उस्मानाबादेत सध्या दोन नावांची चांगलीच चर्चा सुरु आहे आणि दुसरं म्हणजे एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान जन्माला आलेत! तुम्ही म्हणाल हा काय प्रकार? तर त्याचं झालं असं की, उस्मानाबाद जिल्ह्यातील चौधरी कुटुंबानं आपल्या मुलांची नावं थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेवली आहेत. ते ही पाळण्यात घालून, अगदी परंपरेनुसार! (Chaudhary couple from Osmanabad have named their children President and Prime Minister)

उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) गावातील दत्ता आणि कविता चौधरी यांनी आपल्या बाळाचं “पंतप्रधान” असं नामकरण केलंय! इतकंच नाही तर त्यांच्या पहिल्या मुलाचं नावही ‘राष्ट्रपती’ असं आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत! ग्रामीण भागात बाळाचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात केला जातो. त्यासाठी खास पाळणा, आकर्षक सजावट केली जाते, पै-पाहुण्यांना निमंत्रण दिलं जातं. मग बाळाच्या कानात कुरररर करुन त्याचं नाव ठेवलं जातं. ही परंपरा जपत अगदी उत्साहात चौधरी कुटुंबाने आपल्या दोन्ही मुलांचा नामकरण सोहळा केलाय.

‘राष्ट्रपती’चं आधार कार्डही तयार!

अलीकडच्या काळात राजकीय नेते मंडळी, चित्रपटातील अभिनेते-अभिनेत्री, फार तर देवादिकांची नावं आपल्या बाळाला दिली जातात. मात्र, देशाच्या सर्वोच्च पदाची नावंच आपल्या बाळाला देण्याचं काम दत्ता आणि कविता चौधरी यांनी केलं आहे. त्यामुळे ‘राष्ट्रपती’ आणि ‘पंतप्रधान’ हे दोघे भाऊ आता एकाच घरात बागडताना दिसणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे चौधरी कुटुंबाने आपल्या पहिला मुलाचं अर्थात ‘राष्ट्रपती’चं आधार कार्डही बनवून घेतलं आहे.

Osmanabad Naming Ceremony

उस्मानाबादेतील एका दाम्पत्याने आपल्या बाळांची नावं राष्ट्रपती आणि पंतप्रधान ठेवली आहेत.

चौधरींना आपल्या मुलांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान करायचंय!

सध्या देशाच्या राजकारणात पदांसाठी होणारी रस्सीखेच तुम्ही-आम्ही पाहतच असतो. मात्र, इथे राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहणार आणि वाढणार आहेत. या दोन्ही बाळाचे वडील दत्ता चौधरीही फक्त मुलांचं नामकरण करुन मोकळे झाले नाहीत. तर त्यांना भविष्यात आपल्या मुलांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान करायचं आहे.

इतर बातम्या :

Pradnya Satav : विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

‘नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं’, खडसेंचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा

Chaudhary couple from Osmanabad have named their children President and Prime Minister

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.