AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तातडीने मुंबईला या…; देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचे सत्तारांना आदेश, संध्याकाळच्या बैठकीत काय घडणार?

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर गंभीर आरोप करणाऱ्या अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समन्स बजावला असून आज संध्याकाळी तातडीची बैठक बोलावली आहे.

तातडीने मुंबईला या...; देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचे सत्तारांना आदेश, संध्याकाळच्या बैठकीत काय घडणार?
abdul sattar devendra fadnavis eknath shinde
| Updated on: Jun 02, 2026 | 12:55 PM
Share

विधानपरिषद निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यातच अब्दुल सत्तार यांनी भाजपने शिंदेंची शिवसेना संपवण्याचे काम केलं, अस आरोप केला होता. आता या विधानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

अब्दुल सत्तार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीत मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी अब्दुल सत्तार यांना तातडीच्या बैठकीसाठी मुंबईत बोलावले आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

भाजपकडून शिवसेना संपवण्याचे काम; सत्तारांचे खळबळजनक आरोप

छत्रपती संभाजीनगर-जालना जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपला सुटली असून, भाजपने येथून सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुंडके उडवण्याचे काम भाजप करत आहे. आमचा गुवाहाटीतील त्याग भाजप पूर्णपणे विसरली असून, त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकंच तोडलं आहे,” असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य सत्तारांनी केले होते.

तसेच, “जिल्ह्यात शिवसेनेत दोन भाग करून एका भागाला हाताशी धरायचे आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा, अशी खेळी खेळून जर आमचा मोठा भाऊ आम्हालाच संपवणार असेल, तर आमच्याकडे दुसरा इलाज नाही,” असा थेट संताप त्यांनी व्यक्त केला होता.

संध्याकाळच्या बैठकीत काय होणार?

अब्दुल सत्तार यांच्या या विधानांमुळे भाजप नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यापूर्वीच समीर सत्तार यांची बंडखोरी मागे कशी करून घ्यायची आणि अब्दुल सत्तारांची नाराजी कशी दूर करायची, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना थेट बैठकीला येण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे अब्दुल सत्तारांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का? समीर सत्तार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? की महायुतीमधील हे अंतर्गत युद्ध आणखी पेटणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...