AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दानवेंच्या उमेदवारीने राजकारणात खळबळ, आता राऊतांनी ट्वीट करून निकाल लावून टाकला; उद्या 11 वाजता…

ठाकरे गटाने अंबादास दानवे यांच्या नवाची घोषणा केली आहे. दानवे आता विधानपरिषदेची निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडून वेगळा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दानवेंच्या उमेदवारीने राजकारणात खळबळ, आता राऊतांनी ट्वीट करून निकाल लावून टाकला; उद्या 11 वाजता...
sanjay raut and ambadas danveImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 29, 2026 | 4:21 PM
Share

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपाने नुकतेच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाने यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाने विधानपरिषदेच्या निवडणुकीचे तिकीट दिले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा, यासाठी प्रयत्न केला जात होता. शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्यक्ष ठाकरे यांनीच उमेदवार राहावे यासाठी प्रयत्न केले होते. परंतु आता ठाकरे गटाने ऐनवेळी विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेत अंबादास दावने यांना तिकीट दिले आहे. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केले आहे.

संजय राऊत यांच्या ट्वीटमध्ये नेमके काय आहे?

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आमच्या पक्षाकडून तसेच महाविकास आघाडीचे विधानपरिषदेच्या निवडणुकीचे उमेदवार अंबादस दानवे हेच असतील, असे जाहीर केले. त्यानंतर लगेच संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीविषयी भाष्य केले. ‘अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे,’ असे संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेसने आपली वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांना तिकीट दिले असले तर आम्ही काँग्रेसकडून आमचा उमेदवार देणार आहोत. पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? महाविकास आघाडीत काँग्रेसची मनधरणी कशी केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा