5

Medical Student Accident | ‘त्यांनी स्नॅक्स मागवला, केक कापला, नंतर…’ हॉटेल मालकाने सांगितली वर्धा अपघातापूर्वीची कहाणी

त्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी गेल्यानंतर हा दुर्दैवी अपघात घडला. या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी बर्थ डेचं सेलिब्रेशन केलं, तसेच ज्या ठिकाणी ते थांबले त्या हॉटेल मालकाने आता प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सर्व हकीकत सांगितलीय.

Medical Student Accident | 'त्यांनी स्नॅक्स मागवला, केक कापला, नंतर...' हॉटेल मालकाने सांगितली वर्धा अपघातापूर्वीची कहाणी
wardha accident
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 1:36 PM

वर्धा : सोमवारी म्हणजेच 24 जानेवारी रोजी मध्यरात्री वर्धा जिल्ह्याच्या (Wardha Accident) सेलसुरा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा (Medical Student Accident) जागीच मृत्यू झाला. या हादरवून सोडणाऱ्या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघाताला दोन दिवस होऊन गेले असले तरी लोक या धक्क्यातून बाहेर पडलेले नाहीत. मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी गेल्यानंतर हा दुर्दैवी अपघात घडला. या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी बर्थ डेचं सेलिब्रेशन (Birthday Celebration) केलं, तसेच ज्या ठिकाणी ते थांबले त्या हॉटेल मालकाने आता प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सर्व हकीकत सांगितलीय.

अपघातापूर्वी विद्यार्थ्यांनी काय केलं, हॉटेल मालकाने सांगितलं…

माँ की रसोई या रेस्टॉरंमध्ये हे विद्यार्थी आले होते. त्या रेस्टॉरंटच्या मालकाने टीव्ही 9 मराठीसोबत बातचित केली. “ते साते ते साडेसातच्या दरम्यान माझ्या हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी माझ्याकडून स्नॅक्स घेतले. माझ्या हॉटेलच्या मागे एक गार्डन आहे. त्या गार्डनवर ते बसले. तेथे त्यांनी केक कट केला. माझ्यासाठी ते सर्व लोक नवे होते. साधारणत: अकरा वाजता त्यांनी बील पे केलं. साडे अकरा वाजता ते येथून निघून गेले. त्यांनी मद्य प्राशन केले किंवा नाही, याबात मला माहिती नाही. मी किचनमध्ये होतो,” असं हॉटेलच्या मालकाने सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं ट्विट

दरम्यान, हे सर्व विद्यार्थी नेमके गेले कुठे होते, याबाबत चर्चा सुरु होती. मात्र हॉटेलमधील  सीसीटीव्ही समोर आल्यानंतर हे सर्व यवतमाळ जिल्ह्यात नसून वर्धा जिल्ह्यातच गेले असल्याचं समोर आलंय. मंगळवारी संध्याकाळपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले होते. या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत दुःख व्यक्त केलं होत. तसंत अपघातातील मृतांच्या नातेवाईंकांना आर्थिक मदतीचीही घोषणा केली होती.

इतर बातम्या :

Love Crime | आधी विवाहित महिलेशी संबंध, नंतर लग्न करुन खून, तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ?

Delhi Gang Rape | 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, केस कापून महिलांनी धिंड काढली, दिल्लीत पुन्हा निर्भया

Nagpur Police | नागपुरातून मोबाईल चोरीला, परत मिळण्याची शक्यता नव्हती; प्रजासत्ताकदिनी 17 जणांना गूडन्यूज!

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?