एटीएम कटिंग करून रोख रक्कम पळवली, येथील अट्टल टोळी तेलंगणातून जेरबंद

वर्ध्याच्या वायगाव (निपाणी ) येथील एटीएम मशीन गॅस कटरनं कापला. 23 लाख 78 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविले होते. तसंच बोरगाव इथलं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.

एटीएम कटिंग करून रोख रक्कम पळवली, येथील अट्टल टोळी तेलंगणातून जेरबंद
वर्ध्यातून एटीएम फोडून 24 लाख लंपासImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 5:26 PM

टीव्ही ९, वर्धा : एटीएम कटिंग करून रक्कम पळविणार्‍या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. एटीएम कटिंग करून 24 लाख रुपये लंपास करणार्‍या हरियाणातील अट्टल टोळीला तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून वर्धा पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी मोबाईल, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी फायटर, तीन एटीएम कार्ड, दोन फेक नंबर प्लेट, एक वाहन असा मुद्देमाल जप्त केलाय.

वर्ध्याच्या वायगाव (निपाणी ) येथील एटीएम मशीन गॅस कटरनं कापला. 23 लाख 78 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविले होते. तसंच बोरगाव इथलं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.

चोरट्यांनी रेकी करून चोरीच्या वाहनाचा वापर केल्याचं आढळून आलं. तपासादरम्यान आरोपी हरियाणा येथील नुह मेवात जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. हरियाणा येथे एक तपास पथक पाठवून माहिती गोळा करण्यात आली.

आरोपी धाब्यावर असल्याची माहिती

तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे यातील आरोपी तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथे असल्याचे दिसून आले. त्यावरून वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथे जावून पाहणी केली. एका मेवात धाब्यावर यातील आरोपी थांबून असल्याचे दिसून आले.

जंगलात पळून जात होते आरोपी

धाब्यावर छापा घालून तेथून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. दोन आरोपी धाब्याचे मागील बाजूने जंगलात पळून जात होते. त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितलं.

अशी आहेत आरोपींची नावं

पोलिसांनी अटक केलेल्यांची नावं हरियाणातील साबीर लियाकत खान व अन्सार सुले खान अशी आहेत. हे दोघेही घोरावली जिल्हा पलवल येथील आहेत. इरफान शकूर शेख हा सौफना जिल्हा पलवल येथील आहे. तर शेर मोहम्मद शेख हा बावला जिल्हा नुहू येथील आहे. या चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.