रिसोडमध्ये गोडाऊनला भीषण आग; घटनेत एकाचा मृत्यू
रिसोडमध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली, या आगीमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

आगीत एकाचा मृत्यू
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रिसोडमध्ये सराफा लाईन परिसरामध्ये एक गोडाऊन आहे. या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली. गोडाऊनमध्ये सामान असल्याने आगीने चांगलाच पेट घेतला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या आगीत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
आग लागल्यचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने अखेर अग्निशमनदलाला बोलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पोलीस देखील घटनास्थळी हजर झाले होते.
भर पावसात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; काहीही झाले तरी मागे हटणार नसल्याचा निर्धार
