Natural holi colours: होळी खेळा नैसर्गिक रंगांनी, शाळेत विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे फायदे विद्यार्थ्यांना समजावले

यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी एन.सी.गोंडाने यांनीही विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाचे फायदे आणि रासायणिक रंगाचे अपाय विद्यार्थ्यांना समजावून सांगीतले.

Natural holi colours: होळी खेळा नैसर्गिक रंगांनी, शाळेत विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे फायदे विद्यार्थ्यांना समजावले
washimImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 9:06 AM

वाशिम : सृजनाचे प्रतिक असलेल्या वसंत ऋतुमध्ये (spring season) येणारा होळी हा सण सर्वत्र 6 मार्च रोजी साजरा होणार असून होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी (holi 2023) खेळली जाते. मात्र रंगपंचमीला वापरात येणारे रासायणिक रंग त्वचा आणि आरोग्यासाठीही घातक आहेत. त्यानुषंगाने, वाशीम (Washim) येथील एस. एम. सी. इंग्लिश शाळेच्या राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी वसंत ऋतुत बहरणाऱ्या विविध पाने आणि फुलांपासुन नैसर्गिक रंग बनवून पर्यावरणपुरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश दिला.

लाल, केशरी व पिवळया रंगाची उधळण करीत असल्याचे…

होळीच्या पुर्वी वसंत ऋतुमध्ये पळस ही वनस्पती फुलून लाल, केशरी व पिवळया रंगाची उधळण करीत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. निसर्गातील हा सुचक आपसुकच मानवालाही पर्यावरणपुरक रंगांचा वापर करण्याचा संदेश देतो. त्यानुषंगाने एस. एम. सीच्या प्रांगणात या नैसर्गिक रंगनिर्मीती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक रंगनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन एस.एम.सी इंग्लीश स्कुलचे शिक्षक अभिजीत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

रंगपंचमीला नैसर्गिक रंग वापरण्याची शपथ घेतली

यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी एन.सी.गोंडाने यांनीही विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाचे फायदे आणि रासायणिक रंगाचे अपाय विद्यार्थ्यांना समजावून सांगीतले. विद्यार्थ्यांनीही विविध रंगीबेरंगी पानां-फुलांपासुन नैसर्गिक रंग करून या रंगपंचमीला नैसर्गिक रंग वापरण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील काही भागात होळी नैसर्गिक रंगांनी खेळताना पाहायला मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा

त्वचा आजार उद्धभवण्याची शक्यता

होळीच्या दिवशी चुकीच्या पद्धतीने रंगांची उधळण केली जाते. त्याचबरोबर रसायनातून काही कलर तयार केले जातात, त्यामु्ळे अनेकांना इजा होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर काही रंग चेहऱ्यावरुन आठ दिवस जात नाहीत. केमिकल रंगामुळे त्वचा आजार सुध्दा उद्भवण्याची शक्यता असते.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.