काय आहे मराठवाड्यात? दुष्काळाच्या झळा, माणुसकीचा लळा..; भोऱ्याचं भाषण पुन्हा तुफान गाजलं, पहा Video
आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस आहे, या निमित्तानं पुन्हा एकदा भोऱ्या उर्फ कार्तिक वजीर यानं भाषेनं केलं आहे, त्याचं हेही भाषण चांगलंच गाजलं असून, त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस आहे, मराठवाडा रझाकारच्या ताब्यातून मुक्त झाला, याची आठवण म्हणून 17 सप्टेंबर रोजी दरवर्षी मराठवाड्यामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भोऱ्या उर्फ कार्तिक वजीर याने त्याच्या शाळेत केलेलं भाषण पुन्हा एकदा तुफान गाजलं आहे, त्याने यापूर्वी केलेलं एक भाषण देखील चांगलंच गाजलं होतं.
जालना जिल्ह्यातील रेवलवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या भोऱ्या ऊर्फ कार्तिक वजीर याचे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळेत भाषण झालं. मराठवाड्याचे कौतुक आणि वास्तव सांगत भोऱ्याने शाळेत भाषणादरम्यान वर्गमित्र आणि गावातील वडीलधाऱ्या मंडळींच्या टाळ्या मिळवल्या. या भाषणाचा व्हिडीओ आता समोर आलं आहे.
यावेळी त्याच्या मुंबईतील मित्रानं त्याला विचारलं, भोऱ्या असं काय आहे तुझ्या मराठवाड्यात? या मित्राला भोऱ्यानं भाषणातून जे उत्तर दिलं, त्या उत्तरानं भोऱ्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत, त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे, त्याचं हे भाषण देखील तुफान गाजलं आहे.
भोऱ्यानं भाषणात काय म्हटलं?
भोऱ्या असं काय आहे तुझ्या मराठवाड्यात असा सवाल त्याला त्यांच्या मुंबईतील मित्रानं केला, त्याला उत्तर देताना भोऱ्यानं सांगितलं की, ‘दुष्काळाच्या झळा माणुसकीचा लळा आपुलकीचा जिव्हाळा. दगडाच्या खाणी, प्रसिद्ध अजिंठा वेरूळची लेणी. नऊवारी पैठणी आणि नाथसागराच निर्मळ पाणी. आद्य कवी मुकुंदराजाचं कुळ, छत्रपती शिवरायांचं मूळ, संत नामदेव एकनाथांची वाणी, तीर्थयात्रेच्या स्थानी, तीन ज्योतिर्लिंगांना गोदापाठीचं पाणी,’ असं भोऱ्यानं आपल्या भाषणात म्हटलं आहे.
जालना जिल्ह्यातील रेवलवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या भोऱ्या ऊर्फ कार्तिक वजीर याचे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळेत भाषण झालं. हे भाषण चांगलंच गाजलं आहे pic.twitter.com/lhCh6tBcWh
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 17, 2025
दरम्यान यावेळी बोलताना त्याने पुन्हा एकदा आपल्या खास शौलीमध्ये राजकारणावर देखील मिश्किल शब्दात भाष्य केलं आहे. ‘शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा दोर, राजकारणी येथे सगळेच चोर. निजामानी लुटलं राजकारण्यांनी ओरबडलं, असं म्हणत त्याने राजकारण्यांना टोला लगावला आहे. त्याचा हा व्हिडीओ आता समोर आला असून, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं आहे, भोऱ्यानं आपल्या भाषणातून जोरदार टाळ्या मिळवल्या आहेत.
