Shahajibapu Patil: ‘आम्हाला झाडं, डोंगराचंच कौतुक, आमचे काय बांद्र्यात बंगले आहेत?’, आमदार शहाजीबापू काय म्हणाले?

सभेवर टीका करणाऱ्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासादर चंद्रकांत खैरे यांना स्टेजवर कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकून द्यायल्या हव्या होत्या. म्हणजे त्यांना या सभेत किती गर्दी झाली आहे हे पाहता येईल. अशी टीका शहाजीबापू यांनी केली आहे.

Shahajibapu Patil: 'आम्हाला झाडं, डोंगराचंच कौतुक, आमचे काय बांद्र्यात बंगले आहेत?', आमदार शहाजीबापू काय म्हणाले?
शहाजीबापू काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 5:52 PM

मुंबई – आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आम्हाला झाडं, डोंगारच (tree and mountains)चांगली वाटणार, आमचे काय बांद्र्यात बंगले (Bunglow in Bandra) आहेत का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केला आहे. उद्धव, आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं आहे. पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने मंत्री संदीपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या सभेत गुवाहाटीफेम शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनी काय गुन्हा केला, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, आताही शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे.

अंबादास दानवे आणि खैरे यांच्यावर टीका

सभेवर टीका करणाऱ्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासादर चंद्रकांत खैरे यांना स्टेजवर कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकून द्यायल्या हव्या होत्या. म्हणजे त्यांना या सभेत किती गर्दी झाली आहे हे पाहता येईल. अशी टीका शहाजीबापू यांनी केली आहे. मैदानात या आणि संदीपान भुमरे यांची ताकद बघा, असे आव्हान त्यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे. खैरे यांना पुन्हा खासदारकी मिळणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पैठणच्या लोकांनी गावातील सगळी फुलं उधळलीत, असं कौतुक त्यांनी एकनाथ शिंदे यांचे केले आहे. शेतकरी ते रिक्षाचालक ते राजकीय नेते ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेल्या एकनाथ शिंदे हे तळमळीने काम करीत आहेत, असे शहाजीबापू म्हणाले. मुख्यमंत्री असतानाही आता लहान मुलांच्या ह्रद्याच्या शस्त्रक्रिया मुख्यमंत्री येत्या महिन्यात करीत आहेत. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी केले.

हे सुद्धा वाचा

शिंदेंना आम्ही घेऊन गेलो होतो

सूरत आणि गुवाहाटीला एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गेले नव्हते. तर आम्ही सगळे आमदार त्यांना घेऊन गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शिवसेनेच्या आमदारांची कोणतीही कामे झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आम्हीच एकनाथ शिंदेंना घेऊन गेलो. जर आत्ता गेलो नाही तर शिवसेना राहणार नाही, असे आमदारांनी त्यांना सांगितले होते. पुढच्या निवडणुकीत १० आमदार येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंसोबत ४ बैठका झाल्या, आम्ही प्रश्न मांडले मात्र त्यावर उपाय निघाला नाही, असेही शहाजीबापू म्हणाले.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.