VIDEO: माझ्या वडिलांना दोन वर्ष, काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवलं, आम्ही तुरुंगाला घाबरणारे नाही; देवेंद्र फडणीस कडाडले

पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी साबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचा एक स्थगन प्रस्ताव आज विधानसभेत मांडला.

VIDEO: माझ्या वडिलांना दोन वर्ष, काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवलं, आम्ही तुरुंगाला घाबरणारे नाही; देवेंद्र फडणीस कडाडले
देवेंद्र फडणवीस स्टिंग ऑपरेशन प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:13 PM

मुंबई: पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी साबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी याबाबतचा एक स्थगन प्रस्ताव आज विधानसभेत मांडला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी उत्तर देताना फडणवीसांना या प्रकरणात गोवण्याचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कालचे प्रश्न पाहिल्यावर याला काही राजकीय रंग असेल असं वाटतं. प्रश्न कुठे बदलले आणि कुणी बदलले हे मला माहीत आहे. मी कोणत्या घरातून येतो हे माहीत आहे का? इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवले. त्यांनीही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही जेलला घाबरणारे नाही. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा प्रकारच्या मुद्द्यावर आम्ही लढतच राहणार. जी काही कायदेशीर लढाई असेल ती लढू, अशी गर्जनाच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

गृहमंत्र्यांनी नीट विषय मांडला आहे. मला प्रश्नावली पाठवण्यात आली होती. त्यावर मी लेखी उत्तर देऊन सांगितलं होतं की मला उत्तर द्यायचं आहे. मला प्रिव्हलेज घ्यायचं नव्हतं हेही मी स्पष्ट केलं होतं. मला जी प्रश्नावली पाठवण्यात आली होती त्यातील प्रश्न साक्षीदाराचे होते. कालचे प्रश्न आरोपीसाठीचे होते. तुम्ही ऑफिशियल सिक्रेसीचा भंग केला का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. असं साक्षीदाराला विचारतात का? जाणीवपूर्वक प्रश्नावली बदलून या व्यक्तीला गुंतवता येतं का हेही यातून दिसत होतं. मी वकील आहे. मलाही समजतं. एक नागरिक म्हणून व्हिसल ब्लोअर अॅक्टप्रमाणे मी प्रोटेक्टेड आहे. जे कागदपत्रं माझ्याकडे होते. ते मी कुणाला दिले नाही. केंद्रीय गृहसचिवांना मी ते दस्ताऐवज दिले. पण तुमच्या मंत्र्यानेच ते मीडियाला दिले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वळसे पाटील काय म्हणाले?

त्यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. एसआयटीतील (SIT) डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे. तपास करताना सर्कल पूर्ण करावं लागतं. पोलिसांनी काही प्रश्न विचारले तरी उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे. हा रुटीनचा भाग आहे. मी कायदा शिकलो कदाचित माझ्या माहितीत फरक असेल. क्रिमिनल केसेसमध्ये कुणालही इम्युनिटी नाही. फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली. केवळ माहिती घेण्यासाठी नोटीस दिली. जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा किंवा कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा संबंध नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. तसेच तपास अधिकारी त्याबाबत चौकशी करेल. त्यावरून अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे हा विषय थांबवा, असं आवाहनही दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी केलं.

संबंधित बातम्या:

धक्कादायक…! खासगी शिकवणीच्या शिक्षकाने फोडला बारावी केमिस्ट्रीचा पेपर!

शेतीचं कर्ज फेडायचं कसं? नैराश्यातून तिनं जीवन संपवलं, औरंगाबादेत शेतकरी पत्नीच्या आत्महत्येनं हळहळ

Maharashtra News Live Update : महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले; पटोलेंचा रावसाहेब दानवेंना टोला

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.