Weather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या उसंत घेतली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे.

Weather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, IMD कडून ऑरेंज, यलो ॲलर्ट जारी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 4:59 PM

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या उसंत घेतली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे.

दोन दिवस पावसाचा जोर कमी

हवामान विभागानं 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करताना विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट, यलो अ‌ॅलर्ट जारी केले आहेत. तर, कोणत्याही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. 28 जुलै रोजी हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तर, 29 जुलै रोजी ठाणे, रायगड, सिंधुदर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

शुक्रवार, शनिवारी पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी 30 आणि 31 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे तर, पालघर, मुंबई, ठाणे आणि सिधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यावर वरुण राजा बरसला

अखेर गोंदिया जिल्हावर वरुण राजा खुश झाला असून रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरूच आहे.त्यामुळेच की घरात कोनाड़यात ठेवलेल्या छत्रा आणि रेनकोट बाहेर निघाले आहेत. गोंदिया जिल्हात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. जिल्हात भात रोवणीच्या कामाला जोमात सुरुवात झाली आहे, असे असले तरी जिल्हात केवळ 39%पाऊस पडला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नदी,नाले, तलावात पाणी साठा हव्या त्या प्रमाणात नाही. इतकेच की काय जिल्ह्यात पडलेल्या या पावसामुळे जिल्हातील धरणे आजही 50 टक्के भरली नाहीत. त्यामुळे या पावसाने थोड्या फार प्रमाणात का होईना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून अजून ही दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे.

इतर बातम्या:

महापुराचा फटका-गोकुळला झटका, कोट्यवधी रुपयांचं नुकसान, शासनानं अनुदान द्यावं, गोकुळच्या अध्यक्षांची मागणी

Video | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा

Weather Update Today IMD predicted rain will be increased in Maharashtra at all districts of Kokan and Pune Satara Kolhapur

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.