Weather Update Today: कोकणाला दिलासा मिळणार? राज्यात पावसाची स्थिती कशी? हवामान विभागाचा नवा अंदाज नेमका काय?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला असून महाराष्ट्रात पाऊस कमी होईल, असं सांगितलं आहे.

Weather Update Today: कोकणाला दिलासा मिळणार? राज्यात पावसाची स्थिती कशी?  हवामान विभागाचा नवा अंदाज नेमका काय?
सांकेतिक छायाचित्र

मुंबई: भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी अ‌ॅलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला असून महाराष्ट्रात पाऊस कमी होईल, असं सांगितलं आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसात कोणत्याही जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिलेला नाही .

आजच्या दिवसासाठी ऑरेंज अ‌ॅलर्ट

मुंबई वेधशाळेनं रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

पुढील चार दिवस यलो अ‌ॅलर्ट

उद्या 25 जुलैसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर 26 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 27 जुलै आणि 28 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईला दिलासा

राज्यातील पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अदाज जारी करताना हवामान विभागानं पुढील पाच दिवसात मुंबईला कोणताही अ‌ॅलर्ट दिलेला नाही. मुंबईसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

कोल्हापुरात आर्मीचं युनिट पाचारण

पंचगंगा आणि इतर नद्यांची पाण्याची पातळी पाहता आर्मीचे एक युनिट कोल्हापूर जिल्ह्यात पाचारण करण्यात आलं आहे. 65 जवानांची टीम कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ भागात काम करणार आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आर्मीचे जवान सज्ज झाले आहेत. एनडीआरएफ जवानांच्या 4 टीम कोल्हापूरमध्ये आल्या आहेत. कोल्हापूर विमानतळावर एनडीआरएफची आणखी एक टीम दाखल झाली असून या टीम कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यासाठी असणार आहेत. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.

इतर बातम्या:

Vegetables Rate: महापुराचा भाजीपाल्याला फटका, मुंबई बाजारसमिती भाज्यांचे दर घसरले, 100 गाड्या माल पडून

Monsoon Alert : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून रेड, ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी

weather update today imd predicted reduction in rain over Maharashtra issue orange and yellow alert

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI