वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा सक्रिय ; महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याचशा भागात पाच दिवस पाऊस व गारपीट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात 18 ते 20 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तसेच एक-दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. (Western Disturbances reactivated; Five days of rain and snowfall in most parts of the country including Maharashtra)

वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा सक्रिय ; महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याचशा भागात पाच दिवस पाऊस व गारपीट
महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यंत अवकाळी पाऊस

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याचशा भागांमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. अशातच आता वातावरणावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव दिसून येणार आहे. या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि लडाखसह देशाच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात 18 ते 20 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तसेच एक-दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वातावरणातील या बदलाबाबत अलर्ट केले आहे. (Western Disturbances reactivated; Five days of rain and snowfall in most parts of the country including Maharashtra)

वातावरणात नेमका काय बदल झाला

पश्चिम हिमालयीन क्षेत्रात आजपासून पश्चिमेकडील वाऱ्यांचे परिणाम दिसतील. यामुळे या भागात 17 आणि 18 मार्च रोजी मुसळधार पाऊस व हिमवृष्टी होईल. त्याचप्रमाणे देशाच्या वायव्येकडील भागात 18 आणि 19 मार्च रोजी पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पर्वतरांगा असलेल्या काही राज्यांत पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम होईल. त्यामुळे या भागातही पाऊस आणि हिमवृष्टी होईल. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाखसह 16 मार्चपासून पुढील पाच दिवस पाऊस आणि बर्फवृष्टी होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल

स्कायमेट वेदरच्या म्हणण्यानुसार येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि लडाखमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17 आणि 18 मार्च पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 18 आणि 19 मार्चला मध्य भारतात पावसाची तीव्रता वाढेल. मध्य प्रदेश, विदर्भ तसेच दक्षिण पूर्व आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यासह अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ईशान्य राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये 19 मार्चपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, आसाम, त्रिपुरा आणि मणिपूरचा समावेश आहे. येथे जोरदार वारा सुटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता

हिमाचल प्रदेशात बुधवार आणि गुरुवारी मध्य व उच्च पर्वतरांगा असलेल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त 21 आणि 22 मार्च रोजी मध्यम आणि उच्च पर्वतीय भागात पाऊस व बर्फ पडण्याची शक्यता आहे. 22 मार्च रोजी मैदानी भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 21 मार्चपर्यंत मैदानी भागात हवामान स्वच्छ राहील.

पंजाबमधील जालंधर येथे 19 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये 17 मार्चपर्यंत सकाळ आणि संध्याकाळ ढगाळ वातावरण राहील. चक्रीवादळाचा प्रभाव हिमाचलमध्ये अजूनही कायम आहे. त्यामुळे जालंधरमधील हवामानही बदलेल. आज बर्‍याच भागात रिमझिम पावसाची शक्यता आहे. (Western Disturbances reactivated; Five days of rain and snowfall in most parts of the country including Maharashtra)

इतर बातम्या

रोजगार देणाऱ्या ‘वस्त्रोद्योगा’ला बळ देणार, अजित पवारांकडून ‘या’ 3 महत्त्वाच्या निर्णायांचे संकेत

सोने खरेदी करण्यासाठी किती फायदेशीर ठरेल? जाणून घ्या…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI