AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके एकटे नाहीत… उद्धव ठाकरे यांचे मोठे संकेत , आई-वडीलांशी संवाद साधत काय दिला संदेश?

Uddhav Thackeray on Abhijeet Dipke Marriage: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. ठाकरे यांनी अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांना फोन केला. त्यांनी अभिजीत दिपके याच्या लग्नाबाबतही विचारपूस केली. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके आता एकटे नाहीत असे मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला तेव्हा मोठे संकेत दिले. 

अभिजीत दिपके एकटे नाहीत... उद्धव ठाकरे यांचे मोठे संकेत , आई-वडीलांशी संवाद साधत काय दिला संदेश?
उद्धव ठाकरे, अभिजीत दिपके
| Updated on: Aug 01, 2026 | 10:21 AM
Share

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. ठाकरे यांनी अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांना फोन केला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी फोनवरून बातचीत करून दिली. त्यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यांनी अभिजीत दिपके याच्या लग्नाबाबतही विचारपूस केली. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके आता एकटे नाहीत असे मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला तेव्हा मोठे संकेत दिले.

अभिजीतचं लग्न कधी करणार?

अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी अभिजीतची आई अनिता दिपके फोनवरून त्यांच्याशी बोलल्या. अभिजीतच्या लग्नाचा काय विचार आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला. त्यावर प्रत्येक आई-वडिलांना मुलांच्या लग्नाचे स्वप्न असते. मी अभिजीत यांना यापूर्वी सुद्धा याविषयी विचारले होते. पण याविषयीचा निर्णय तोच घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष अभिजीतच्या पाठीमागे

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे अभिजीत दिपके यांच्या घरी भेटीसाठी गेले होते. त्यांनी उद्धव ठाकरे आणि दिपके यांच्या कुटुंबियात संवाद साधून दिला. त्यांनी व्हिडिओ कॉल लावला. खैरे हे जवळपास एक तास दिपके यांच्या घरी होते. उद्धव ठाकरे यांनी दिपके कुटुंबियांना यावेळी विश्वास दिला की, संपूर्ण विरोधी पक्ष हे अभिजीतच्या पाठीमागे आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे.

अभिजीत दिपकेची पुढील योजना काय?

अभिजीत दिपके यांनी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी कोणताही नवीन पक्ष स्थापन करणार नसल्याचे सांगितले आहे. तर रिस्पॉन्स ग्रुप स्थापन करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकरी, विद्यार्थी, तरूणांच्या मागण्यांसाठी हा दबाव गट काम करेल असे त्यांनी स्पष्ट केले. तर पेपरफुटीविरोधातील कायदा, पीडित कुटुंबियांना भरपाई, नवीन शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती आणि सरकारचा हेतू यावर त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोनम वांगचुक यांना भेटू दिले नाही असा आरोपही त्यांनी केला. CJP च्या आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता. तर जनतेने हे आंदोलन उचलून धरल्याचे दिपके म्हणाले. भाजप नेत्यांनी आपल्याला आणि कुटुंबियांना धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

अभिजीत दिपके यांचे कुटुंबिय हे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज-बजाजनगर परिसरात राहतात. दिपके हे एक व्यावसायिक राजकीय संवाद रणनीतीकार आहेत. त्यांनी पुण्यातून पत्रकारितेतील पदवी संपादित केली आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिका गाठली. बोस्टन विद्यापीठातून त्यांनी पब्लिक रिलेशन विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश