AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे आहे कोण? संभाजी ब्रिगेड नावाला विरोध का?

गेल्या काही महिन्यांपासून संभाजी ब्रिगेड या नावाला दीपक काटे याच्या शिवधर्म फाउंडेशनकडून विरोध केला जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकरी नाम उल्लेख होत असल्याने नाव बदलण्यात यावे, अशी शिवधर्म फाउंडेशनकडून केली आहे.

प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे आहे कोण? संभाजी ब्रिगेड नावाला विरोध का?
| Updated on: Jul 14, 2025 | 12:41 PM
Share

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणात दीपक सिताराम काटे याचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी दीपक काटेसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु त्याच्यासोबत आमचा संबंध नाही, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

कोण आहे दीपक काटे ?

दीपक काटे याने शिवधर्म फाउंडेशनची स्थापना केली. तो या संस्थेचा संस्थापक आहे. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक काटे याने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी संभाजी बिडी विरोधात आंदोलन केले होते. दीपक काटे याच्या आंदोलनानंतर संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आले होते. याशिवाय दूध दराच्या प्रश्नी दीपक काटे याने शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयबाहेर आंदोलने केली होती.

25 जून 2021 मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक अशोक जिंदालला काळे फासले होते.

संभाजी ब्रिगेड नावाला विरोध?

गेल्या काही महिन्यांपासून संभाजी ब्रिगेड या नावाला दीपक काटे याच्या शिवधर्म फाउंडेशनकडून विरोध केला जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकरी नाम उल्लेख होत असल्याने नाव बदलण्यात यावे, अशी शिवधर्म फाउंडेशनकडून केली आहे.

यापूर्वी यामुळे झाली होती अटक

6 जानेवारी 2025 पुणे विमानतळावरून हैदराबादला जात असताना प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काढतूसे सापडली होती. त्यावेळेस दीपक काटे याला अटक करण्यात आली होती. मुळगाव पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या सराटी गावात शेताच्या बांधाच्या वादावरून सख्ख्या चुलत भावाचा त्याने खून केला होता. त्या गुन्ह्यात तो सात वर्षे तो येरवडा कारागृहामध्ये होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो सध्या इंदापूर शहरात भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहे.

भाजपमध्ये सक्रीय

2022 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर 26 मार्च 2023 रोजी इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या 52 शाखेचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून देखील त्याची ओळख आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.