कोण आहे मनिष भानुशाली जो राष्ट्रवादीच्या टार्गेटवर आहे? फडणवीसांसोबत फोटो, गंभीर आरोप कोणते?

भानुशाली हा राष्ट्रवादीच्या टार्गेटवर असून त्याची चांगलीच कसून चौकशी केली जाण्याची चिन्हे आहेत. त्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.

कोण आहे मनिष भानुशाली जो राष्ट्रवादीच्या टार्गेटवर आहे? फडणवीसांसोबत फोटो, गंभीर आरोप कोणते?
कोण आहे मनिष भानुशाली जो राष्ट्रवादीच्या टार्गेटवर आहे?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Oct 06, 2021 | 3:27 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या दाव्यांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी जे आरोप केले आहेत, त्यात त्यांनी मनीष भानूशालीचे नाव घेतले आहे. हा भानुशाली कोण आहे? त्याचे राजकीय नेत्यांशी कसे व कुठपर्यंत संबंध आहेत? ड्रग्ज प्रकरणात तो कसा आला आणि त्याचे या प्रकरणाच्या साखळीत कुठपर्यंत हात माखलेले आहेत? याबाबत आता विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भानुशाली हा राष्ट्रवादीच्या टार्गेटवर असून त्याची चांगलीच कसून चौकशी केली जाण्याची चिन्हे आहेत. त्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तो विविध गंभीर आरोपात अडकला जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (Who is Manish Bhanushali who is the target of NCP, Photos with Fadnavis, what are the serious allegations)

काय म्हणाले नवाब मलिक?

एनसीबीनं कारवाई केली. त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याबरोबर सेल्फी काढण्यात आला. सेल्फी व्हायरला झाला तो एनसीबीचा अधिकार नाही असा मलिकांचा दावा आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही असं सांगण्यात आलं. मग हा व्यक्ती नक्की कोण? असा सवाल करीत एनसीबीला याबाबत उत्तर द्यावं लागेल, असे मलिक म्हणाले. मनीष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे फोटो नरेंद्र मोदी, अमित यांच्यासह भाजप नेत्यांबरोबर आहेत. एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि मनीष भानुशालीचा संबंध काय? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

काही फोटो एनसीबीने जारी केले आहेत. त्यात काही नशेचे पदार्थ दाखवण्यात आलेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आलेत पण हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे आहेत. गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय, एनसीबीनं उत्तर द्यावं? मनिष भानुशाली यांचा संबंध काय? खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली? त्यांना काही अधिकार आहेत का? भाजप आणि बॉलिवूड राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. 21 तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर 22 तारखेला गांधीनगर भागात होता. 21, 22 तारखेलाच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलं. त्यामुळं 28 तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता? कुठल्या मंत्र्यांना भेटला याचं उत्तर एनसीबीनं द्यावे, असे सवाल नवाब मलिक यांनी विचारले आहेत.

एनसीबी अधिकाऱ्यालाही आर्यनसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही

मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केलं आहे. या अटकेनंतर देशात चांगलीच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर तर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो अतिशय चिंताक्रांत असल्याचे दिसतेय. मात्र, या सर्व प्रकरणामध्ये आर्यन आणि एका एनसीबी अधिकाऱ्याच्या एक फोटोची विशेष चर्चा होत आहे. या फोटोमध्ये कथित एनसीबी अधिकाऱ्याने आर्यन खानसोबत सेल्फी घेतली आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आर्यनने लाल रंगाचे बटनलेस शर्ट तसेच पांढरे टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातलेली दिसत आहे. आर्यनसमोर उभा असलेला माणूस हा एनसीबीचा अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पकडला गेला असला तरी त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह एनसीबी अधिकाऱ्याला आवरता आलेला नाही. नाराज आणि चिंताग्रस्त असला तरी आर्यनने एनसीबी अधिकाऱ्याच्या सेल्फी कॅमेऱ्याकडे पाहिले आहे.

फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा

कथित एनसीबी अधिकाऱ्याचा आर्यन खानसोबतचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो समाजमाध्यामावर कसा आला हे समजू शकलेले नाही. मात्र हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोक या फोटोला वेगवेगळ्या समाजमाध्यमावर शेअर करत असून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. (Who is Manish Bhanushali who is the target of NCP, Photos with Fadnavis, what are the serious allegations)

इतर बातम्या

आर्यन खानसोबत फोटो, एनसीबी म्हणते आमचा संबंध नाही, कोण आहे किरण गोसावी, ज्याच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप?

ज्याचे मोदी, शहांसोबत फोटो तो भानुशाली एनसीबी कारवाई करताना हजर कसा?; नवाब मलिक यांचे भाजप, एनसीबीला पाच सवाल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें