रेव्ह पार्टीत गांजा, कोकीन आणि पोरी… छापेमारीत पकडलेले कोण आहेत प्रांजल खेवलकर?; खडसे कुटुंबाशी कनेक्शन काय?
पुण्यातील रेव्ह पार्टीमुळे राजकारण मोठा भूकंप आला. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रेव्ह पार्टी करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलंय. रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल जाणून घ्या महत्वाची माहिती.

पुणे : मध्यरात्री पुणे पोलिसांनी खराडीमध्ये छापेमारी करून रेव्ह पार्टी उधळून टाकली. मात्र, या छापेमारीनंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडण्यात आले. खडसेंची लेक रोहिणी खडसे यांचा प्रांजल खेवलकर पती असून घटस्फोटानंतर त्यांनी बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजलसोबत लग्न केले. प्रांजल हे मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबियांसोबतच राहतात.
यापूर्वीही प्रांजल खेवलकर हे मोठ्या वादात गाडीमुळे सापडले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केली होती. रेव्ह पार्टीमध्ये पुणे पोलिसांनी काही पुरूषांसोबतच महिलांना देखील ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टीमधून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मेडिकल करण्यात आल्याचीही माहिती मिळतंय. पोलिसांना पार्टीच्या ठिकाणी हुक्का, दारू आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडली आहेत.
प्रांजल खेवलकर कोण? त्यांचा व्यवसाय नेमका काय हे सर्व जाणून घ्या. रोहिणी खडसे या राजकारण सक्रिय आहेत तर प्रांजल खेवलकर हे एक व्यावसायिक आहेत आणि त्यांचे रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम आहे. त्याच्या काही कंपन्या देखील आहेत. प्रांजल हे जरी मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबियांसोबत राहत असले तरीही त्यांचे पुण्यात कायमच येणे जाणे सुरू असते. पतीला ताब्यात घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी यावर काहीही भाष्य केले नाही.
जावयाला ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सांगितले की, माझे त्यांच्यासोबत काही बोलणे झाले नाही आणि ते पोलिसांच्या ताब्यात असल्याने मला काही माहिती मिळू शकली नाही. जर ही रेव्ह पार्टी असेल आम्ही जावई गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर शासन व्हावे. पुण्यातील रेव्ह पार्टीमधून पुणे पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोकेन आणि गांजा मिळालाय. यासोबतच पार्टीच्या ठिकाणीहून दारूच्या बाटल्याही मिळाल्या आहेत. रेव्ह पार्टीमधून अटक करण्यात आलेल्या सर्वांचे मेडिकल झाले असून पोलिस पुढे काय कारवाई करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ देखील पुढे आला.
