AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरहरी झिरवळांचा व्हिडीओ कोणी व्हायरल केला? करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा, थेट नावच घेतलं

काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे यांनी मोठा दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नरहरी झिरवळांचा व्हिडीओ कोणी व्हायरल केला? करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा, थेट नावच घेतलं
karuna sharma Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Apr 01, 2026 | 5:22 PM
Share

काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान त्यावर नरहरी झिरवळ यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे, हा व्हिडीओ फेक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या व्हिडीओवर आता करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, करुणा मुंडे यांनी या व्हिडीओबाबत मोठा दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नरहरी झिरवाळ यांचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी व्हायरल केला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांना मंंत्रिपदावर जाण्याची घाई झाली आहे, त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे? 

नरहरी झिरवळ यांचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी व्हायरल केला आहे. त्यांना मंत्रिपदावर जाण्याची घाई झाली आहे, त्यामुळे त्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा माझा दावा आहे, परंतु त्यांचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. नरहरी झिरवाळ यांचा व्हिडियो नेमका कसा व्हायरल झाला? याची सरकारने चौकशी करावी, धनंजय मुंडे यांची  एसआयटी चौकशी करावी, धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट आणि सीबीआय चौकशी देखील करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अजूनही काही गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केले आहेत.  पहिलं लग्न माझ्याशी केलं, 2000 मध्ये 75 लाख रुपये घेऊन गेले. माझ्या हृदयाला छिद्र आहे, उपचारासाठी लंडनला जात आहे असे त्यांनी सांगितले.  माझी आई तारामती शर्मा यांनी कोणाच्या दबावाखाली विष प्राशन केले आणि त्यांचा मृत्यू झाला? असा सवालही यावेळी करुणा मुंडे यांनी केला आहे. 2019 मध्ये मंत्री झाल्यानंतर या लोकांकडे कोट्यवधी रुपये कुठून आले? याची चौकशी व्हावी. राजश्री मुंडे,  वाल्मिक कराड, राजू घवते, मोनिका सिंग, रेखा सिंग, स्वातिका शिरोडकर, लता पप्पी, अभय मुंडे, अज्या मुंडे यांच्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी व्हावी,  अशी मागणी यावेळी करुणा मुंडे यांनी केली आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.